आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन: सलामीसाठी बॉलीवूड कलाकारांची जय्यत तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई सध्या आनंदाच्या रंगात न्हाऊन निघाली आहे. हे दररोज धावणारं शहर जसं काही सचिनबाबतच्या गप्पांसाठी जणू काही क्षण थांबूनच गेले आहे. चोहीकडे केवळ सचिनचीच चर्चा आहे. रिक्षापासून अत्यंत महागड्या कारचालकापर्यंत सगळे सचिनबाबत चर्चा करण्यातच स्वत:ला धन्य समजून घेत आहेत. हा सामना पाहायला दोन हजारांपेक्षा अधिक अनिवासी भारतीय भारतात दाखल झाले आहेत. त्याचबरोबर बॉलीवूडचे अनेक दिग्गज स्वत:च्या व्यस्त वेळापत्रकात बदल करून सचिनच्या सामन्यासाठी हजेरी लावण्याचे नियोजन आखत आहेत. आमिर खान आणि रणबीर कपूर हे सामना पाहायला येणार असल्याची जोरात चर्चा आहे.
अशीच चर्चा या शताब्दीचा महानायक अमिताभ बच्चनबाबतही आहे. अभिषेक आणि ऐश्वर्यासमवेत ते सामना पाहण्यास येण्याची शक्यता आहे. या सामन्याला पाहण्याची शाहरुख खानचीदेखील इच्छा आहे. मात्र शाहरुखवर मुंबई क्रिकेट असोसिएशनने मैदानात येण्याबाबत पाच वर्षांची बंदी घातलेली आहे. त्यामुळे शाहरुखवरील ही बंदी हटवली गेली, तरच तो हा सामना बघू शकणार आहे. त्याशिवाय हा सामना पाहण्यासाठी अनेक देशांचे अनेक राजकारणीदेखील येणार आहेत. माझ्याबाबतीत बोलायचे झाल्यास सचिनची मुलाखत घेणारा मी पहिला पत्रकार होतो. त्यावेळी सचिनने कांगा लीगमध्ये एक जबरदस्त खेळी केली होती. आज मुंबईच नव्हे तर संपूर्ण देश सचिनची चर्चा करीत आहे. त्याचे कारणच हे आहे की त्याने सगळ्यांनाच अवर्णनीय आनंद दिला आहे. तो अजेय आहे. सगळ्यात चांगली बाब म्हणजे त्याचे पाय आजही जमिनीवर आहेत. सचिनचा शेवटचा चमत्कार या नजरेत साठविण्याची प्रतीक्षा आज संपुष्टात येणार आहे.