आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता...यापुढे काय करणार सचिन ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मास्टर ब्लास्टर बहुदा त्याच्या जीवनातील अखेरची खेळी करून गेला आहे. त्याच्या प्रत्यक्ष निवृत्तीला आता काहीच तास बाकी आहेत. आता यापुढे तो काय करणार, त्यावर विचारमंथन होणे साहजिक आहे. क्रिकेटशी तब्बल 24 वर्षे ज्याचा संबंध आलेला आहे, तो चौकार आणि षटकारांशिवाय वेळ कसा व्यतीत करणार ? या प्रश्नाचे उत्तर सचिन आणि अंजलीव्यतिरिक्त कुणाकडेच नसेल.
सचिन ज्या अभिजात वर्गात वावरतो, तसेच त्याचा परिपक्व स्वभाव पाहता, त्याने पुढे काय करायचे ते आधीच ठरवलेले असावे. त्याने निवृत्ती घेण्याची घोषणा उगीचच केलेली नाही. किमान दीड वर्ष आधीपासूनच त्याने निवृत्ती घेण्याबाबत मनाची तयारी चालवली होती. तसे नसते तर त्याने राज्यसभा सदस्यत्व स्वीकारले नसते. आता तर त्याला खासदार बनून केवळ एकच वर्ष झाले असून त्याला अजून पाच वर्षांचा कालावधी तिथे उपलब्ध आहे. या काळात तो केवळ राजकारणात खासदार म्हणूनच कायम राहू शकतो किंवा व्यावसायिकाच्या रूपात त्याचे आर्थिक साम्राज्य वाढवू शकतो. सचिनने काय करणार, याबाबत कधीच खुलासा केलेला नसला तरी प्रदीर्घ काळ कुटुंबापासून दूर राहावे लागल्याने आता वर्षभर तरी कुटुंबालाच वेळ देण्यास प्राधान्य देण्याची शक्यता आहे. सचिनचे वय सध्या केवळ 40 असून क्रिकेटसाठी तो म्हातारा झाला असला तरी वैयक्तिक जीवनात त्याला करण्यासारख्या ब-याच गोष्टी आहेत. सचिन आतापर्यंत ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर म्हणून तसेच मॉडेल म्हणूनही तो कार्यरत राहू शकतो. त्याशिवाय सचिनला बीसीसीआय काही मोठी जबाबदारी सोपविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबाबत सचिनशी काही चर्चा झालेली नाही, कारण सचिनला आता थोडे दिवस पूर्ण आराम करायचा आहे. त्यामुळे त्यानंतरच्या काळात सचिनला क्रिकेट मेंटोर किंवा प्रशासकाच्या भूमिकेचीही ऑफर दिली जाऊ शकेल. सचिनजवळ प्रचंड संपत्ती आहे. त्याला पैसा कमावण्यासाठी आता अजून काही करायची गरज नाही. केवळ जीवन गतिमान राखण्यासाठी केवळ काही निर्णय घ्यावा लागणार आहे. माझ्या मतानुसार तो क्रि केटमध्येच आता काही नवीन भूमिकेत परतू शकेल.
(लेखकाने 24 वर्षांपूर्वीदेखील सचिनची सर्वांत पहिली मुलाखत घेतली होती.)