आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शारापोवाच्या विधानावरून इतका वितंडवाद कशासाठी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेनिस सम्राज्ञी मारिया शारापोवाच्या एका विधानानंतर सोशल मीडियावर जणू काही भूकंप आल्यासारखेच झाले. विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला ओळखत नाही, असे ती म्हणाली. सचिनचे चाहते यामुळे प्रचंड नाराज आहेत. शारापोवाच्या ‘कबुली’ला भारताचा अपमानही समजला जातोय. हा तर वेडपटपणा झाला. हां, भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा, लिएंडर पेस, महेश भूपतीला ओळखत नसल्याचे ती म्हणाली असती, तर ते आश्चर्य ठरले असते. मग शारापोवा सचिनला ओळखत नसेल तर त्याचा इतका बभ्रा कशासाठी? शारोपावा रशियाची आहे. तिथे क्रिकेट खेळले जात नाही.

एका दृष्टीने हा वाद हास्यास्पद आहे आणि दुसरीकडे खेळाच्या तोकड्या ज्ञानाचेही उदाहरण आहे. सोशल मीडियावर शारापोवाच्या विधानाने खळबळ उडाली. मात्र हीच मंडळी भारताला क्रीडा राष्ट्र बनवण्यासाठी आवाज का देत नाहीत. ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर या देशात क्रीडा संस्कृती रुजली आहे. 2018 मध्ये गोल्डकोस्टमध्ये (ऑस्ट्रेलिया) राष्ट्रकुल स्पर्धा होणार आहे. एक शक्तिशाली क्रीडा राष्ट्र अशी ऑस्ट्रेलियाची ओळख आहे. ते क्रिकेट, हॉकी, रग्बी, टेनिस, अँथलेटिक्स, जलतरणात सर्वेत्तम आहेत.

लंडन ऑलिम्पिकमध्ये जलतरणात अपयश पदरी पडताच ऑस्ट्रेलियात एक नवी योजना बनवली गेली. भविष्यात जलतरणात यश मिळवणे हा उद्देश होता. क्रीडा राष्ट्राच्या खेळ नियोजनाचा हा उत्तम नमुना. एखाद्या खेळाडूचा उदो उदो करण्यात त्यांना स्वारस्य नसते. ऑस्ट्रेलियातील अनेक मैदाने आणि विद्यापीठांच्या अभ्यासानंतर असे जाणवले की, ऑस्ट्रेलियन क्रीडा परिषद आपल्या देशाला उंचीवर नेण्यासाठी खूप काही करत आहे. ग्रीफिथ विवि येथे खेळाडूंच्या शरीर तसेच मनस्वास्थ्यासाठी खूप प्रयत्न केले जातात. निवडक अँथलेट्सवर मेहनत घेतली जाते. फिरकी जादूगर मुरलीधरनलाही अँक्शन सुधारण्यासाठी याच ठिकाणी पाठवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाला पाहून असे वाटले की हे खरेच एक क्रीडा राष्ट्र आहे. खेळाप्रती जागरूकता आहे. हवामान चांगले आहे.

मोकळ्या मैदानांवर मूलभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. लोकांची शरीरठेवण चांगली आहे. एकूणच खेळासाठी आदर्श वातावरण आहे. राष्ट्रकुल स्पर्धेचे (2018) सल्लागार प्रमुख तसेच ग्रीफिथ विविचे प्रमुख ख्रिस्टोफर यांना विचारले असता ते म्हणाले की, मूलभूत सुविधा, औषधे आणि मुबलक पैशाशिवाय क्रीडा संस्कृती जोपासणे महत्त्वाचे आहे. येत्या काही वर्षांत खेळात आमचा देश सर्वोच्च स्थानी असेल हे त्यांनी छातीठोकपणे सांगितले. रशियाच्या शारापोवासारख्या टेनिस सम्राज्ञीला हरवणारे खेळाडू तयार करणे हे कांगारूंचे ध्येय आहे. सोशल मीडियावर भांडण्यात त्यांना काहीच रस नसल्याचे सध्या दिसून येत आहे.
(फोटो - अयाज मेमन)