आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ayaz Memon Article About Captain Dhoni Divya Marathi

नव्या विचारांसह धोनीने मैदानावर परतावे.!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर तीन महिन्यांनंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीविरुद्ध टीकेची धार अधिक प्रखर केली जाते. कदाचित याच कारणामुळे तो आशिया चषकातून दूर झाला आहे. कसेही असो, यातून धोनीला निष्पक्षपणे आपल्या क्रिकेट करिअरच्या भविष्याबद्दल विचार करण्याची संधी मिळाली.
धोनी मागील तीन महिन्यांतील टीम इंडियाच्या सुमार कामगिरीला विसरण्याचा प्रयत्न करेल. भारताला दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ न्यूझीलंड दौर्‍यात कसोटी आणि वनडे मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले.एका दृष्टीने 2013 हे वर्ष यामुळे अविस्मरणीय ठरू शकले नाही. या पराभवाच्या मालिकेमुळे धोनीवर प्रखर टीका केली जात आहे. मात्र माझ्या मते, टीम इंडियाच्या सुमार कामगिरीला केवळ कर्णधारच जबाबदार नसतो. 2012 मध्ये इंग्लंड टीमने भारताला हरवले होते. मात्र त्यानंतर इंग्लंडला 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत 0-5 ने पराभवाचा सामना करावा लागला. विजय आणि पराभवाच्या वेळी कुक हाच इंग्लंडचा कर्णधार होता. माझ्या मते, मागील दीड वर्षात अधिकाधिक संघ विदेशी दौर्‍यात पराभूत झाले आहेत. मग यात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया असो की, वेस्ट इंडीज किंवा भारत. जागतिक क्रिकेटमध्ये सध्या टॉप-5 किंवा सहा संघांच्या कामगिरीतील अंतर फारच कमी झालेले आहे.
गचाळ गोलंदाजी ही भारतीय संघासाठी नेहमीचीच डोकेदुखी असल्याचे आरोप सत्य आहे. विदेशी खेळपट्टय़ांवर भारतीय संघातील गोलंदाज समाधानकारक कामगिरी करू शकत नाहीत. आमचे क्षेत्ररक्षणही दुबळे आहे. याच कारणामुळे विजय हाती असतानाही टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागते. विदेशी खेळपट्टीवर आतापर्यंत झालेल्या दोन मालिकेतील चारपैकी तीन कसोटी सामन्यात टीम इंडिया विजयासमीप पोहोचली होती. मात्र थोडक्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. थोड्याशा प्रयत्नाने भारताचा विजय निश्चित झाला असता. घरच्या मैदानावर वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय संघाचा विदेश दौर्‍यात धुव्वा उडत आहे. प्रथम इंग्लंडने आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्याला 0-4 च्या समान अंतराने पराभूत केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडनेही आपल्याला धुळ चारली. याच कारणामुळे धोनीवर होणारी टीका ही स्वभाविक आहे. मागील तीन वर्षांत विदेश दौर्‍यात भारतीय संघाला सर्वाधिक संधी मिळाल्या. मात्र कर्णधार धोनी या संधीचे चीज करू शकला नाही. तो खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात अपयशी ठरला आहे. शक्यतेला वास्तवात उतरावे आणि संधीचेही सोने करावे, हाच टीम लीडरचा खरा अर्थ आहे. धोनीने यात सर्वांची निराशा केली आहे. धोनीने टीमचे नेतृत्व किंवा कोणत्याही एका फॉर्मेटचे कर्णधारपद सोडून देणे, हा माझ्या मते उपाय नाही. धोनीला 2015 पर्यंत संधी देण्यात यावी, या राहुल द्रविडच्या तर्काशी मी सहमत आहे. सातत्याने यष्टिरक्षण, फलंदाजी आणि नेतृत्वाखाली धोनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकला आहे. त्याला विर्शांतीची गरज आहे. आशिया चषकातून त्याने स्वत:ला दूर केले आहे. आता याच विर्शांतीच्या काळात नवा विचार करून टीम इंडियाला पुन्हा विजयी ट्रॅकवर आणण्याची संधी त्याला आहे. धारदार गोलंदाजी करताना 4 बळीदेखील घेतले.