आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल : पुन्हा फिक्सिंगचे वादळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएलमध्ये सामनानिश्चितीचा डाव हाणून पाडण्यात आला. फिक्सिंगचे काळेकुट्ट ढग घोंगावू लागले असले तरी अनैतिक पैशांचा पाऊस मात्र पडला नाही. आयपीएल-८ सुरू होऊन आठवडाही लोटला नाही. मुंबईस्थित राजस्थान रॉयल्सच्या एका क्रिकेटपटूला त्याच्या मुंबई रणजी संघातील सहकार्‍याने सामनानिश्चितीसाठी ‘निमंत्रण’ िदले होते. ज्या खेळाडूने ही घटना संघ व्यवस्थापनला सांगितली तो अभिनंदनास पात्र आहे. यापूर्वी खेळाडू फिक्सिंगच्या फासात मश्गूल असत आणि आयपीएलची भ्रष्टाचारविरोधी समिती झोपा काढायचे काम करी. ही समिती आता खेळाडूंचे समुपदेशन करत आहे. सट्टेबाजांपासून सावध राहण्याचा सल्ला ती देत आहे. त्यामुळे त्या खेळाडूने वेळीच ऑफरची माहिती दिली.

आतापर्यंत सामनानिश्चिती प्रकरणात दलालच खेळाडूंना चेतावत होते. मात्र नव्या प्रकरणात खेळाडूनेच खेळाडूला ऑफर देऊ केली. याचा अर्थ असा की, फिक्सिंगचा फास खेळाडूंच्या माध्यमातूनच आवळला जाऊ लागला आहे. भारतीय क्रिकेट जगतात दोन वर्षांहूनही जास्त काळापासून आयपीएल वादाची न्यायालयीन प्रकरणे चालू आहेत. सामनानिश्चिती रोखण्यासाठी आणखी कठोर पावले उचलावी लागतील. नुकतेच घडलेले फिक्सिंग प्रकरण बीसीसीआयनेच सार्वजनिक केले ही आनंदाची बाब. मात्र, मंडळाने हे प्रकरण लगेच का सांगितले नाही आणि त्या खेळाडूंची नावे का जाहीर केली नाहीत, हे प्रश्न निरुत्तरितच राहतात. नाव न जाहीर करण्यामागे गोपनीयता हा विषय असू शकतो. माझ्या माहितीनुसार, बीसीसीआयने आतापर्यंत भ्रष्टाचारविरोधी समितीचे पुनर्गठन केलेले नाही, तर दुसर्‍या समित्यांचे पुनर्गठन झाले आहे. बीसीसीआय ताज्या प्रकरणाची माहिती घेत आहे. मात्र त्या दलालाला शोधण्याचे मोठे आव्हान आहे. आयपीएलमुळे खेळाडूंना ताबडतोब प्रसिद्धी आणि बक्कळ पैसा मिळतो.

मात्र फ्रेंचाइजी संघांनी गेले मानधन चुकते न केल्याची आणि जास्त पैसा न देताच विकत घेतल्याची तक्रार अनेक खेळाडू करतात. हे असे खेळाडूच सट्टेबाजांच्या हातचे बाहुले बनतात. २०१२ मध्ये एका टीव्ही चॅनेलने स्टिंग ऑपरेशन केले होते. मनासारखा मोबदला न मिळाल्याने संघमालकांना ठोकरण्यात कमी लोकप्रिय खेळाडूंनी तयारी दर्शवल्याचे त्यात दाखवले होते. भ्रष्टाचार फक्त क्रिकेटमध्येच नाही. संपूर्ण तंत्रच सुधारावे लागेल. आयपीएलच्या माध्यमातून सट्टेबाजांचा मुसक्या बांधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, असे म्हणता येईल.