आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्विन नंबर वन, मात्र संघातून बाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचा ऑफस्पिनर आर. अश्विनला आयसीसीने क्रमवारीत २०१५ चा सर्वश्रेष्ठ कसोटी गोलंदाज म्हणून जाहीर केले आहे. त्याने वर्षभरात सर्वाधिक ६२ बळी घेतले. आश्चर्य म्हणजे आयसीसीने ज्याला सर्वश्रेष्ठ गोलंदाज म्हणून घोषित केले, त्याला आयसीसीच्या कसोटी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. त्याला १२ वा खेळाडू म्हणून निवडण्यात आले. नंबर वनच्या घोषणेनंतर अश्विनच्या चेहऱ्यावर मनमुराद हास्य आले नसेल. अायसीसीची टीम जवळपास एक महिना आधी जाहीर झाली आणि अश्विनने द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेत त्यानंतर कमाल प्रदर्शन केले, असे काही जण म्हणू शकतात.

अश्विनने आपल्या शानदार कामगिरीने ७ वर्षांपासून नंबर वन डेल स्टेनला मागे टाकले. मी हे सांगू इच्छितो की, अश्विनने श्रीलंकेच्या भूमीवर तीन कसोटींत २१ बळी घेतले होते, हे आयसीसीला माहिती नव्हते काय? तेथे केलेली कामगिरी त्यांना विश्वस्तरीय वाटली नाही काय? अश्विनने स्पिन गोलंदाजी खेळण्यात माहिर कुमार संगकाराला चार वेळा बाद केले नव्हते काय? श्रीलंकेत केलेल्या कामगिरीच्या आधारे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्यायलाच हवे होते. अश्विनने श्रीलंका आणि द. आफ्रिकेविरुद्ध ७ कसोटी सामन्यांत ५२ विकेट घेतल्या. श्रीलंकेतील ३ कसोटींत २१ बळी, द. आफ्रिकेविरुद्ध ४ कसोटींत ३१ बळी घेतले. त्याच्या करिअरचा ग्राफ २०१५ मध्ये टॉपला पोहोचला.

अश्विनला हे यश फिरकीला अनुकूल अाशियाई खेळपट्ट्यांवरच मिळाले आहे, हे खरे आहे. मात्र, अश्विनने दर्जेदार फलंदाजांना बाद केले आहे, यामुळे त्याच्या कामगिरीला कमी लेखले जाऊ नये. अश्विनची गोलंदाजी वनडेच्या लायक आहे, कसोटीच्या नाही, अशी टीका करणाऱ्यांनाही अश्विनने सडेतोड उत्तर दिले आहे. अश्विनने वनडे आणि टी-२० मध्ये सलग विकेट घेतल्याने त्याच्यावर अशी टीका झाली. कसोटीत त्याला मोठे यश २०१५ मध्ये मिळाले. कॅरम बॉलच्या प्रारंभिक यशानंतर अधिकच प्रयोग करत असल्याचा आरोपही अश्विनवर होतो. युवा असल्याने कसोटीत प्रयोगशील असणे, हे चुकीचे नाही, असे मला वाटते. गोलंदाजीत बरेच शिकताना त्याला प्रयोगही करायचे आहेत. त्याला यशही मिळू लागले आहे. अश्विनने अवघ्या ३२ कसोटींत १७६ विकेट घेतल्या आहेत. त्याचा प्रवास सुरू आहे. येत्या काही वर्षांत तो अनेक वेळा नंबर वन बनू शकतो.
बातम्या आणखी आहेत...