आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईसीबीचे नवे अंकगणित क्रिकेटसाठी अव्यवहार्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंड क्रिकेट मंडळाने पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध यंदाच्या उष्ण मोसमातील दोन द्विपक्षीय मालिकांसाठी नव्या अंकगणिताचा प्रस्ताव ठेवला अाहे. त्यावर टीका होत आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने तर याला बकवास म्हटले आहे. तसे पाहिल्यास इंग्लंड क्रिकेट मंडळाचा प्रस्ताव चुकीचा नाही. द्विपक्षीय मालिकेला पुन्हा सोनेरी दिवस यावेत यासाठी मंडळ प्रयत्नशील आहे. टी-२० क्रिकेटचा प्रसार झपाट्याने होत आहे, हे सारेच जाणतात. अनेक देशांत आयपीएलसारख्या लीग सुरू झाल्यात. अशा वेळी द्विपक्षीय मालिकांची लोकप्रियता कायम ठेवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करणे गरजेचेच आहे.

इसीबीने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तीनही प्रकारांसाठी प्रस्ताव दिला आहे. प्रत्येक सामन्यानंतर अंकप्रणालीचा वापर करावा आणि मालिका समाप्तीनंतर गुणांच्या आधारे विजेता घोषित करावा, असे मंडळ सांगते. इसीबीला नेमके काय अपेक्षित आहे, हे या प्रस्तावावरून अजून स्पष्ट झालेले नाही. टी-२० क्रिकेटचा परीघ र्इसीबीला छोटा करायचाय का? की द्विपक्षीय मालिकेला अधिक लोकप्रिय बनवायचे आहे? इसीबीचा प्रस्ताव आहे की, कसोटी सामना जिंकणाऱ्या संघाला ५ गुण, एकदिवसीय सामना जिंकणाऱ्याला ३ तर टी-२० सामना जिंकणाऱ्या संघाला २ गुण द्यावेत. तिन्ही प्रकारांतील सामने संपताच एकूण गुणांच्या आधारावर विजेत्याचा निर्णय व्हावा. इसीबीने स्पष्ट केले आहे की, समजा द्विपक्षीय मालिकेत ५ कसोटी, ५ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने असल्यास एकूण गुण ४६ होतील. प्रस्तावित गुणप्रणालीला अव्यावहारिक मानले जाऊ लागले आहे. कारण संघाने पाच कसोटी जिंकल्या तर त्याला २५ गुण मिळतील. तर विरोधी संघाने पाचही वनडे, तिन्ही टी-२० सामने जिंकल्यास २१ गुणच मिळतील.

निष्कर्ष हा की दोन्ही प्रकारांत विजय मिळवूनही संघ विजेता बनणार नाही. कारण कसोटी सामन्यांसाठी जास्त गुणांची सूचना. अशा वेळी क्रिकेट मंडळ, खेळाडू आणि चाहत्यांमधून कडवट विरोध वाढू शकतो. उदाहरणार्थ, भारताने गतवर्षी ऑस्ट्रेलिया दौरा केला. पाचपैकी चार एकदिवसीय सामने कांगारूंनी जिंकले. टीम इंडियाने एक वनडे आणि तीन टी-२० सामन्यांत विजय मिळवला. इसीबीच्या प्रस्तावानुसार गुण वाटल्यास चार वनडे जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे १२ तर एक वनडे आणि तीन टी-२० सामने जिंकणाऱ्या भारताचे ९ गुण होतील. ्रिकेटचा अधिक विस्तार करायचा असल्यास आयसीसीने जागतिक कसोटी मालिका भरवावी. वनडे तसेच टी-२० विश्वचषक स्पर्धा होतात, मग कसोटीसाठी हा दुजाभाव कशासाठी? विश्वचषक कसोटी स्पर्धा आयोजनापासून आयसीसीचे आस्ते कदम समजण्यापलीकडचे आहे.
बातम्या आणखी आहेत...