आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सचिन, लक्ष्मण, गांगुलीची जबाबदारी ‘अाेपन’ व्हावी !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेटचे तीन सुपरस्टार सचिन तेंडुलकर, साैरव गांगुली अाणी व्हीव्हीएस लक्ष्मणने अाता अापली दुसरी इंनिग सुरू केली अाहे. अाता हे तिघेही भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीअाय) सल्लागाराची भूमिका बजावणार अाहेत. या तिघांच्या क्रिकेटचा अनुभव प्रशासनाला चालवण्यासह खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी कामी येणार अाहे. तसेही या तिघांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. मात्र, या तिघांचा सल्ला हा फायदेशीर ठरेल, हे मात्र नक्की. यापूर्वी २००८ मध्ये (स्व.) नवाब पतोडी, रवी शास्त्री अाणि सुनील गावसकरला अायपीएलच्या गर्व्हिन काैन्सिलमध्ये सहभागी करण्यात अाले हाेते. तेव्हाचा हा प्रयाेग अपयशी राहिला. यामुळे अनेक वाद निर्माण झाले हाेते. चांगले शासन ही काही जादूची कांडी नाही. अधिकार खुले हाेईपर्यंत काेणीही विश्वासपूर्ण याबाबत बाेलू शकत नाही. हे तिघेही टीम इंडियाच्या प्रशिक्षक अाणि संचालकांच्या निवडीबाबत सल्ला देतील. मात्र, एकदा नियुक्तीनंतर त्यांची भूमिका स्पष्ट हाेईल. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांचा सल्ला अधिक फायदेशीर ठरेल, असे मला वाटते. नवीन प्रतिभा शाेधणे अाणि चालना देणे, अादर्श खेळपट्टी, नॅशनल क्रिकेट अकादमी संचालित करणे अाणि खेळाडूंच्या निवडीबाबत पारदर्शकता अाणण्यात या तिघांची भूमिका महत्त्वाची ठरेल.

बीसीसीअायने जाहीर केलेल्या यादीत राहुल द्रविडचे नाव नसल्याने अनेक चाहत्यांना धक्का बसला. क्रिकेटला मी अधिक वेळ देऊ शकणार नाही, असे राहुल द्रविडने मला गत काही दिवसांत सांगितले हाेते. मुलांच्या पालनपाेषणासाठी ताे डाॅक्टरी व्यवसायापासून दूर हाेता. मात्र, त्याने पुन्हा हा पेशा स्वीकारला अाहे. शेवटची अाता राहुलची जबाबदारी मुलांना सांभाळण्याची अाहे. राहुल त्यानंतर बीसीसीअायशी जुळेल. सध्या तरी त्रिदेवला दिलेल्या नव्या जबाबदारीने क्रिकेट विश्वात अानंदाची लाट पसरली अाहे.