आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या कसोटीच्या निकालाने ठरू शकते मालिकेचे भविष्य!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत दौऱ्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात प्रभावी ठरली. भारत अ संघातील बरेच खेळाडू नियमित नाहीत, हे खरे असले तरीही पाहुण्या संघांच्या प्रयत्नाला कमी लेखले जाऊ शकत नाही. कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि शॉन मार्श यांच्या शतकाशिवाय ऑफस्पिनर नॅथन लॉयनच्या काही विकेट कांगारूंचा आत्मविश्वास वाढवू शकतात. तीन दिवसांत निकाल लागत नाही. मात्र, चांगल्या खेळीने विशेषत: दुसऱ्या देशांच्या जमिनीवर अॅडजस्ट करण्याचा टीमचा उद्देश पूर्ण होऊ शकतो. ऑस्ट्रेलियाने हे उद्दिष्ट गाठले आहे, असे दिसते.  
 
गेल्या काही दिवसांत भारतीय भूमीवर भारतीय फिरकीला खेळण्याची भीती बऱ्यापैकी वाढली आहे. मागच्या दाैऱ्यात ४-० ने सपाटून मार खाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या हे चांगले लक्षात असेल. विदेशी दौऱ्यात बरेच संघ अजूनही का संघर्ष करतात, ही चकित करणारी बाब आहे. कारण आधीच्या तुलनेत आता विदेशाचे दौरे अधिक होतात. सोबतच टी-२० लीगमध्ये सहभागी होण्यासाठी बरेच खेळाडू विदेशात क्रिकेट  खेळतात. यामुळे विदेशी जमिनीवर खेळण्याची भीती कमी व्हायला हवी. उदाहरण म्हणून सांगायचे झाल्यास १९४७ पासून (भारताच्या स्वातंत्र्यापासून) ते १९७९ पर्यंत ३२ वर्षांत आॅस्ट्रेलियाने केवळ ४ वेळा भारत दौरा केला, तर आता मागच्या १७ वर्षांत कांगारू टीम पाचव्यांदा भारत दौऱ्यावर आली आहे. 

आयपीएलमुळे अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी भारत दुसरे घर बनले आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चमकदार कामगिरीमागे आयपीएलचेसुद्धा योगदान राहिले आहे. या सर्व खेळाडूंना वेगवेगळ्या वातावरणात आधीच्या तुलनेत खुप एक्स्पोजर मिळते. यामुळे विदेशात खेळण्याची अनिश्चितता आणि भीती कमी व्हायला हवी. मात्र, मागच्या दोन दशकांचे निकाल पाहिले तर ही भीती वाढल्याचे दिसते.  

आयसीसी कसोटी क्रमवारीतील नंबर वन टीम भारत आणि नंबर दोन ऑस्ट्रेलिया यांनी गेल्या काही वर्षांत विदेशात अत्यंत सुमार प्रदर्शन केले आहे, ही विडंबनाच आहे. या क्रमवारीत इतके चढ-उतार का झाले, हे यावरून स्पष्ट होते. उपखंडाबाहेर भारताने अखेरचा कसोटी विजय २०११ मध्ये द. आफ्रिकेत मिळवला होता.   
 
अखेर असे का होते?: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ (मागच्या आठवड्यात लॉरियस स्पोर्ट्स अवाॅर्डच्या  वेळी भेट झाली) म्हणतो सर्व काही खेळाडूंच्या डोक्याशी संबंधित  आहे. तो म्हणाला, ‘मला नेहमी घरच्या मैदानात खेळण्यापेक्षा विदेशात खेळणे सोपे वाटले. कारण दबाव कमी, प्रेक्षक भिन्न आणि लक्ष विचलित हाेण्याची शक्यता कमी असते.
 
विदेशात अधिक फोकस करता येते.’ दोन समान शक्तिशाली संघांच्या लढतीबाबत वॉ म्हणाला, ‘सुरुवातीला लय मिळवणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर  ही लय कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. दुसऱ्या संघाला सावरण्याची संधी देऊ नये. असे केले तर यश मिळू शकते.’ आणि मालिका जिंकली. वॉच्या मते पहिल्या कसोटीचा निकाल भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचे चित्र स्पष्ट करेल. 
 
ayazmamon80@gmail.com
बातम्या आणखी आहेत...