आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा भज्जी आणि अमित...युवांंना संधी केव्हा?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत अ संघाचा दुसऱ्या अनधिकृत कसोटीतील पराभव आणि मालिका पराभवामुळे देशातील चाहत्यांना धक्का बसला आहे. ज्या संघाचा कोच आणि मेंटर राहुल द्रविड अाहे आणि ज्या संघात विराट कोहलीसारखा दिग्गज खेळाडू असताना घरच्या मैदानावर, घरच्या प्रेक्षकांसमोर अशा टीमचा पराभव झालाच कसा ? एका पराभवाने एखाद्या निष्कर्षावर येणे चुकीचे आहे, असे आपण म्हणू शकतो. अशा पराभवामुळे आपल्या राखीव फळीच्या उणिवा पुढे येतात, हेसुद्धा खरे आहे. या सामन्यात कोहली खेळला. त्याचे लक्षही बेंच स्ट्रेंथवर होते. त्यालासुद्धा दुसऱ्या फळीतील खेळाडूंना समजण्याची संधी मिळाली. तो भविष्यात याचा दुसऱ्या फळीतील काही खेळाडूंना प्रमोट करू शकतो. सध्या तरी आपल्या फिरकीची ताकद दुबळी झाल्याचे दिसत आहे. आधी आपण फिरकीच्या आधारे जिंकायचो. आता आपली मारक क्षमता घटली आहे. मात्र, पाच विकेट घेणाऱ्या २१ वर्षीय बाबा अपराजितची स्तुती करावी लागेल. विराट श्रीलंकेत ज्या संघाचे नेतृत्व करीत आहे, ते युवा खेळाडू असून संघात स्थायी झालेले आहेत. मात्र, विराटला माहिती आहे की काहीच स्थिर नसते. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. अशात त्याच्याकडे दुसरी फळी तर आहेच. चेन्नईत खेळून विराटने आपला फाॅर्म परत मिळवण्याचा प्रयत्न केला. शिवाय लंकेच्या दौऱ्यावर त्याच्यासोबत असतील अशा युवा खेळाडूंसोबतही खेळण्याची त्याला संधी मिळाली. या युवा खेळाडूंचे मूल्यांकन करण्याची संधीही विराटला मिळाली. चेन्नईच्या सामन्यात कर्णधार पुजारा होता. कोहलीने दुसऱ्या डावात ४५ धावा काढल्या. या कमी असल्या तरीही या काळात त्याच्यासोबत ज्या फलंदाजांना खेळपट्टीवर खेळण्याची संधी मिळाली, त्यांच्या मते त्यांना विराटकडून बरेच काही शिकायला मिळाले.

आपल्या गोलंदाजांनी चेन्नईत निराश केले. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर आपण हरलो. याविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज गुरविंदर संधू आणि फेकेते यांनी दोन्ही डावांत जवळपास ९ गडी बाद केले. आपला ऑफस्पिनर अपराजितने ५ विकेट तर प्रज्ञान ओझाने ४ गडी बाद केले. मात्र, वरुण अॅरोन, शार्दूल ठाकूर यांना एकही विकेट मिळाली नाही. कसोटी क्रिकेटमध्ये पूर्वीप्रमाणे आपली फिरकीची ताकत पुन्हा कशी स्थापित करता येईल, यावर चर्चा झाली पाहिजे. आपल्या फिरकीची ताकत कमी होत अाहे. अश्विनशिवाय एकाही फिरकीपटूला आपली जागा निश्चित करता आलेली नाही. आपले फलंदाजसुद्धा िवदेशी फिरकीपटूंसमोर दबावात येऊ लागले आहेत. ही धोक्याची सूचना नाही काय ?.. २०१२-१३ मध्ये इंग्लंडचे फिरकीपटू माँटी पानेसर आणि ग्रीम स्वान यांनी आपली पंचाईत केली होती. इंग्लंडने आपल्याला आपल्याच घरात बदडले होते. आपण पुन्हा अनुभवी हरभजन आणि अमित मिश्रावर भरवसा करीत आहोत. यांची निवड म्हणजे आपल्याकडे युवा फिरकीपटूंची उणीव आहे, हे संकेत नाहीत काय ? भारताला कसोटीत पुन्हा शक्तिशाली व्हायचे असेल तर आपल्याला पुन्हा दुसरी फळी सशक्त करावी लागेल, असे मला वाटते. आपल्याकडे प्रतिभेची कमी नाही. मात्र, त्यांना अधिकाधिक संधी देणे गरजेचे आहे. अखेर किती दिवस अशी अस्थायी व्यवस्था चालू शकेल.
बातम्या आणखी आहेत...