आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिक्सिंगविरुद्ध मॅक्लुमचे भाषण ठोस अन् प्रभावी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमसीसीने परंपरागत वार्षिक व्याख्यानमालेत या वेळी ब्रेंडन मॅक्लुमला बोलावले होते. मॅक्लुम क्रिकेटच्या दुनियेतला आवडता चेहरा आहे. न्यूझीलंडच्या या अत्यंत आक्रमक फलंदाजाने मागच्या वर्षी निवृत्ती घेतली, तेव्हा क्रिकेट जगताला धक्का बसला होता. खेळातून निवृत्ती घेणे हा खेळाडूचा स्वत:चा निर्णय असतो. बऱ्याच वेळा निवृत्ती घेणारा खेळाडू आणखी काही वर्षे खेळू शकला असता, असे वाटते. तसेच ब्रेंडन मॅक्लुमबाबत वाटत होते. मॅक्लुम केवळ चतुर कर्णधार नव्हता, तर आपल्या आक्रमक फलंदाजीने तो प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करायचा. मॅक्लुमने व्याख्यानात अापल्या फलंदाजी शैलीप्रमाणे फ्रंट फूटवर येऊन अत्यंत आक्रमकपणे भाषण केले. त्याचे व्याख्यान ठोस आणि प्रभावी होती. त्याने क्रिकेटमधील भ्रष्टाचारावर हल्ला केला. क्रिकेटसारख्या टीम गेममध्ये नेतृत्वाच्या मूल्यांना कसे प्रस्थापित करता येते, हे त्याने सांगितले. मी जेव्हा कर्णधार झालो तेव्हा सीनियर खेळाडू रॉस टेलर आणि ज्युनियर खेळाडू केन विल्यम्सन यांच्यात ताळमेळ बसवताना विजयाची भावना वाढवण्याचे आव्हान होते. टेलरला दूर करून मॅक्लुमला कर्णधार बनवण्यात आले होते. संघातील सहकाऱ्यांच्या मदतीने हे काम यशस्वीपणे करू शकलो, असे मॅक्लुम म्हणाला. यामुळे तिन्ही क्रिकेट संघांचे नेतृत्व युवा केन विल्यम्सनच्या खांद्यावर सोपवण्यात आले. मॅक्लुमच्या मते, विल्यम्सन नेतृत्व सांभाळण्यास सक्षम आहे. मॅक्लुमच्या व्याख्यानात सखोलता होती. सहकारी खेळाडू क्रिस केर्न्सविरुद्ध फिक्सिंगचे पुरावे दिल्यानंतरही त्याला सोडण्यात आल्याने भाषणात मॅक्लुमने निराशा व्यक्त केली. त्याने याप्रकरणी आयसीसीच्या अँटी करप्शन युनिटच्या भूमिकेवर टीका केली.
गुन्ह्याच्या प्रकरणात न्यायालय शिक्षा देत असते. मात्र, या प्रकरणात आयसीसीचा दृष्टिकोन सकारात्मक नाही. मॅच फिक्सिंग किंवा स्पॉट फिक्सिंग वाळवीचे काम करत आहे, हे आयसीसीला अजूनही वाटत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असे मॅक्लुम म्हणाला. केर्न्स प्रकरणात फिक्सिंगच्या पुराव्यानंतर तो सुटल्याच्या घटनेला मॅक्लुम विसरू शकलेला नाही. यामुळे त्याने आयसीसीवर कडाडून टीका केली. केर्न्स प्रकरणामुळे ड्रेसिंग रूमवर प्रतिकूल परिणाम झाला. यातून सावरण्यास वेळ लागला, असेही मॅक्लूमने नमूद केले. कोणत्याही खेळाडूला आपले सहकारी खेळाडू आणि देशवासीयांचा विश्वास जिंकण्यासाठी स्वत:ला आदर्श म्हणून सिद्ध करावे लागते. मी माझ्या कार्यकाळात लोकांची मने जिंकू शकलो, याचा आनंद आहे, असे मॅक्लुम म्हणाला. क्रिकेटमध्ये सुधारणेसाठी व्हिसल ब्लोअर जो आवाज बुलंद करत आहे, त्यामुळे खेळात सुधारणा होईल. क्रिकेट निष्कलंक होऊन लवकरच जगभर पाय पसरेल, अशी आशा त्याने व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...