आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णधार धोनीने युवा खेळाडूंना दिली भरपूर संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका ४-१ ने जिंकली आहे. ही मालिका दोन्हीपैकी एका टीमसाठी ३-२ अशीही ठरू शकली असती. टीम इंडियाने अखेरच्या सामन्यात ज्या पद्धतीने खेळ केला तो प्रशंसनीय आहे. ४-० ने मागे पडल्यानंतर कोणत्याही संघाचा आत्मविश्वास कोलमडतो. मात्र, भारतावर पराभवाचा दबाव आहे असे वाटत नव्हते. निडर होऊन भारतीय फलंदाज खेळले आणि संपूर्ण मालिकेत उच्च दर्जाची फलंदाजी, शिस्तबद्ध खेळ तसेच कठीण परिस्थितीत झुंज देण्याची अद््भुत क्षमता दिसली. निश्चितपणे याचे श्रेय कर्णधार धोनी आणि टीम डायरेक्टर शास्त्री यांना जाते. या दोघांनी पराभवाच्या निराशेला ड्रेसिंग रूमपासून दूर ठेवले.
भारताला आता विजयाची सवय पडेल, अशी आशा आहे. धोनीने या मालिकेत युवा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनुभव नसलेल्यांना (गुरकिरत मान, ऋषी धवन, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरण) यांना भरपूर संधी दिली. यांना संधी दिली नाही तर हे परिपक्व कसे होतील, असेही तो म्हणाला. मनीष पांडेचे उत्तम उदाहरण आहे. रहाणे जखमी झाल्यामुळे त्याला संधी मिळाली. पांडेने कमाल प्रदर्शन करून शतक ठोकले. याआधी दोन सामन्यांत मनीष बाहेर हाेता. मनीष पांडे सध्या २६ वर्षांचाच आहे. त्याचे मोठे करिअर शिल्लक आहे. मनीषने अखेरच्या षटकात धोनी बाद झाल्यानंतर निराश न होता फक्त आपले शतक पूर्ण केले नाही तर सामनाही फिनिश केला. मालिकेबाबत बोलायचे झाल्यास घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड शानदार आहे. तसेसुद्धा आपण वर्ल्डकप विजेता टीमकडून हरलो. वर्षापूर्वीच ऑस्ट्रेलियाने आपल्या भूमीवर वर्ल्डकप जिंकले होते. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज शेन वाॅटसन, मायकेल क्लार्क, मिशेल जॉन्सन निवृत्त झाले आहेत. मिशेल स्टार्क जखमी आहे. दोन सामन्यांत वॉर्नर संघाबाहेर होता. रोटेशन शैलीने ऑस्ट्रेलिया प्रत्येकाला संधी देते. यानंतरही त्यांची शक्ती कमी होत नाही. त्यांची बंेचस्ट्रेंथ खूप सशक्त आहे. २०१९ चे वर्ल्डकप लक्षात ठेवून ऑस्ट्रेलियाची टीम तयार होत आहे. पुढच्या वर्ल्डकपपर्यंत स्मिथच कर्णधार असेल. स्मिथच्या नेतृत्वात टीम विजेतेपद कायम ठेवेल, असा विश्वास कांगारूंच्या निवड समितीला आहे. टीम इंडियाच्या निवड समितीनेसुद्धा रोटेशन शैली स्वीकारली पाहिजे. निवड समितीने युवराजसिंग, हरभजनसिंग, सुरेश रैना आणि आशिष नेहरा यांना टी-२० मालिकेसाठी निवडले आहे. हे सर्व वनडेतील जुने दिग्गज खेळाडू आहेत. यांना वनडे मालिकेसाठी का संधी दिली नाही, हा चर्चेचा विषय ठरू शकतो. यांचे टी-२० तील प्रदर्शन तुलनेने चांगले आहे, असे मला वाटते. भारताचे शक्तिस्थान गोलंदाजी नव्हे तर फलंदाजी आहे. धोनी ब्रिगेडने हे सिद्धसुद्धा केले. पाचवा सामना वगळता उर्वरित सामन्यांत मधली फळी कोसळली. चौथ्या सामन्यात टीम इंडिया १/२७७ वरून ३२३ वर धडाम कोसळली. मधली फळी मजबूत करण्यावर लक्ष देणे गरजेचे आहे.