आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटचे स्टार देशाला देणार दुहेरी अानंद!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेटसाठी रविवारचा दिवस हा महत्त्वपूर्ण अाहे. कारण रविवारी भारताचा युवा संघ १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये विंडीजविरुद्ध खेळणार अाहे. हा सामना बांगलादेशमध्ये हाेणार अाहे. याच दिवशी धाेनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विशाखापट्टणमच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तिसरा अाणि शेवटचा निर्णायक टी-२० सामना खेळणार अाहे. भारत अाणि श्रीलंका या दाेन्ही टीमने प्रत्येकी एका विजयासह मालिकेत १-१ ने बराेबरी साधली. अाता तिसरा सामना रविवारी हाेईल. ही मालिका भारताच्या नावे हाेऊ शकते, अशी शक्यता अाहे. त्यामुळे देशाला दुहेरी अानंद साजरा करण्याची संधी मिळू शकते.
भारताच्या वरिष्ठ टीमने दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेविरुद्ध अव्वल कामगिरी करून विजयश्री खेचून अाणली. टीमने माेठ्या अंतराने विजय मिळवला. याशिवाय सांघिक खेळीच्या बळावर सामन्यात बाजी मारली. अायसीसीच्या टी-२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाने पुण्याच्या मैदानावर सलामी सामन्यात सुमार खेळी केली हाेती. मात्र, तसेही टीम इंडियावर प्रचंड दबाव हाेता. कारण अाॅस्ट्रेलिया दाैऱ्यात टीमने ३-० ने मालिका जिंकली हाेती. अाता अागामी अाशिया चषकात टीम इंडियाकडून अव्वल कामगिरीची अाशा केली जात अाहे. कारण वर्ल्डकप अाणि अाशिया स्पर्धा या दाेन्ही अाशियात हाेत अाहेत. त्यामुळेच चाहत्यांना टीम इंडियाकडून दाेन्ही स्पर्धांमध्ये सरस कामगिरीची अाशा तर राहणारच अाहे. रांचीतील विजयाची लय कायम ठेवण्यासाठी अाता भारतीय संघाला अापल्या मूळ डावपेचात बदल करणे गरजेचे अाहे. कारण नव्या डावपेचामुळे टीमला अाता विशाखापट्टणममध्ये विजय साकारता येईल. रांचीत अात्मविश्वासाच्या बळावर भारताने विजयश्री खेचून अाणली.धाेनीला पहिल्या सामन्यात यश मिळाले नाही. मात्र, त्याने रांचीमध्ये पलटवार करून अापली क्षमता सिद्ध केली. तिसऱ्या सामन्यात धाेनीच्या क्षमतेची परीक्षा असेल. या सामन्यात युवराजला चांगली संधी दिली जावी. तसेच हरभजनला अश्विनच्या जागी संघात स्थान देणे फायदेशीर ठरेल. कारण पाच सामन्यांपासून हरभजन हा मैदानाबाहेर बसत अाहे.
युवा टीमवर नजर : रविवारी भारताच्या युवा टीमसाठी रविवारचा दिवस महत्त्वाचा अाहे. कारण टीमसमाेर विश्वचषकाच्या फायनलमध्ये विंडीजचे अाव्हान असेल. सध्या युवा टीमही फाॅर्मात अाहे. त्यामुळे संघावर सर्वांची नजर असेल. विराट काेहली, युवराजसिंग, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे अाणि शिखर धवनने हे सर्वच खेळाडू युवा टीमने देशाला दिलेली माेठी देणगीच अाहे.