आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विराट कोहलीचे वाईट दिवस जातील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडविरुद्ध पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाला. या पराभवामुळे भारताच्या कामगिरीचा दर्जा वनडे फॉरमॅटमध्ये चांगला आहे की नाही हे स्पष्ट होऊ शकले नाही. भारताने वनडे मालिका ३-१ ने िजंकली. मात्र, या अाकड्यांपेक्षा भारतीय संघात हा सामना खेळताना उत्साह अाणि काैशल्याचा माेठ्या प्रमाणात अभाव असल्याचे दिसून अाले. वनडे मािलका जिंकून भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या कसाेटी सिरीजमधील पराभवातून गमावलेल्या प्रतिष्ठेची भरपाई केली अाहे. काहींच्या मते, भारतीय संघ लवरकच लयीत येईल. टीम इंडिया अाता कसाेटी मािलकेत पराभूत झाला. त्यामुळे असे वाटत हाेते की, अागामी वर्ल्डकपपूर्वी मिळालेल्या या पराभवाचा माेठा परिणाम टीम इंिडयाच्या खेळाडूंवर हाेईल. मात्र, संघातील खेळाडूंनी वनडे मालिका जिंकून या सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला. या मािलकेत भारतीय संघाने माेठा उत्साह अाणि काैशल्याच्या बळावर विजयश्री खेचून अाणली. त्यामुळे भारतीय संघ पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर असल्याचे संकेत मिळाले.
कसाेटी असाे वा वनडे या दाेन्ही फाॅरमॅटमध्ये विराट काेहलीने निराशा केली. त्याने काेर ग्रुपची चिंता वाढवली. पुढच्या वर्षी वर्ल्डकप हाेणार अाहे. सुमार कामगिरीचा विराट काेहलीच्या डावपेचावर विपरीत परिणाम पडू शकताे. विराट वगळता भारतीय संघातील इतर सर्वच खेळाडू जबदरस्त फाॅर्मात अाहेत. राेहित शर्माने दुखापतीनंतरही समाधानकारक खेळी केली अाहे. दुखापतीपूर्वी त्याने एक सामना खेळला. यात त्याने शानदार अर्धशतक झळकावले.
विराट काेहली इतर देशांतील खेळपट्टीवर माेठी खेळी खेळण्यासाठी सक्षम अाहे. मात्र, त्याला इंग्लंडच्या खेळपट्टीवर अपयशाला कशामुळे सामाेरे जावे लागत अाहे, हा विचार करण्यास भाग पाडणारा प्रश्न अाहे. याच प्रश्नाचे उत्तर शाेधण्यात गढून गेलेल्या विराटच्या हातून अनेक संधी हुकल्या अाहेत. अाशा अाहे की, त्याचे हे वाइट दिवस लवकरच दूर हाेतील. विराट एक महत्त्वाकांक्षी खेळाडू अाहे. त्याच्यात भारतीय संघातील सर्वाेत्कृष्ट खेळाडू हाेण्याची क्षमता अाहे. अशात त्याच्या पुनरागमनाची अाशा करणे, चुकीचे ठरेल. विराट वगळता इतर सर्वच स्टार खेळाडू वर्ल्डकपसाठी गेम प्लान करून स्वत:ला सिद्ध करू शकले अाहेत. यात सुरेश रैना, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अजिंक्य रहाणे, माेहंमद शमी, राेिहत शर्माचा समावेश अाहे.
मालिकेत ३-० ने विजयी अाघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाने पाचव्या वनडेत संजू सॅमसनला का संधी दिली नाही. संघ व्यवस्थापकाने प्रत्येक खेळाडूला संघाकडून खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढकार घ्यायला हवा हाेता. सॅमसन भारत अ संघासाेबत अाॅस्ट्रेलियात यशस्वी ठरला अाहे. धवन सध्या कसाेटी अाणि तीन वनडेत सातत्याने अपयशी ठरला. त्यामुळे धवनच्या जागी सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता अाहे. दुसरीकडे धवनने पाचव्या वनडेत ९७ धावा काढल्या. धाेनीचे नेतृत्व कसाेटीत कमी रेटिंगचे अाहे. मात्र, वनडे फाॅरमॅटमध्ये ताे यशस्वी ठरला अाहे. त्यामुळे अागामी वर्ल्डकपमध्ये टीम इंिडया किताबावरचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी गेम प्लाॅन अाखू शकते. धाेनीकडून अशा प्रकारची अाशा करणे, चुकीचे नाही.