आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीसीसीअायने उचलली अशी ठाेस पावले की लोढा समितीही बसेल शांत!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कसोटी खेळाडूच्या प्रत्येक सामन्याच्या मानधनात सात लाखांवरून १५ लाखांपर्यंतची वाढ करण्याची ठाेस पावले उचलली अाहेत. यातून बीसीसीआयने या पाच दिवसीय सामन्यांचे महत्त्व वाढवले अाहे. मंडळाच्या कार्यपद्धतीवर टीका करणारी लाेढा समितीही या निर्णयाचा विरोध करणार नाही. खेळावरचे प्रेम अाणि देशासाठी खेळण्याची इच्छा ही पहिली प्राथमिकता असायला हवी. यात पैसा कमावण्याचा कोणत्याही प्रकारचा माेह नसावा. जे लाेक असा विचार करतात, त्यांना माहिती असायला हवी की निवड झालेल्या खेळाडूची नजर ही कसोटीवरच टिकून राहायला हवी. यातूनच त्याचे अार्थिक नुकसान हाेणार नाही, जे वनडे अाणि टी-२० न खेळून हाेते. ताे कसोटी स्टार म्हणूनही काेट्यवधीची कमाई करू शकताे. याशिवाय त्याला जाहिरात श्रेत्रातही माेठी मागणी असते. वनडे अाणि टी-२० क्रिकेटमध्ये पैशांचा पाऊस पडत असल्याचे सर्वांना माहीत अाहे. तर मग असे कसाेटीत का हाेऊ नये? यामुळे बीसीसीअायचा निर्णय हा याेग्य प्रकारचा अाहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा या निर्णयामुळे खेळाडूंची कसोटीतील अावड वाढेल अाणि कसोटीला चांगले दिवस येतील. अाता सर्वाधिक लक्ष वनडेवर केंद्रित असते. मात्र, कसाेटी खेळणारे देश हे या पाच दिवसीय सामन्याला चालना देण्यासाठी सक्रिय अाहे. यामध्ये बीसीसीअायचेही योगदान महत्त्वपूर्ण अाहे.
भारतीय संघातील चेतेश्वर पुजाराचे उदाहरण घ्या, ताे एकच प्रतिभावंत खेळाडू अाहे. मात्र, ताे कसाेटीपुरताच मर्यादित अाहे. त्याची निवड भारतीय संघाच्या वनडे अाणि टी-२० मध्ये हाेऊ शकत नाही. याची त्याला काेणत्याही प्रकारची खंत नाही. वर्षभरात ताे १५ कसाेटी खेळून दाेन काेटींपेक्षा अधिक रुपयांची कमाई करताे. सर्वाधिक कमाई टी-२० मध्ये असले तरी कसाेटीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अाता कसोटीचा मान वाढणार अाहे. त्यामुळेच मिळत असलेल्या सर्वाधिक मानधनामुळे कसाेटी खेळाडूदेखील समाधानी असतील. तसेच कसाेटी सामने कमी हाेत असल्याची काेणतीही खंत त्यांना वाटणार नाही. अायपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नसली तरी त्या खेळाडूंना काेणत्याही प्रकारचे दु:ख हाेणार नाही. या मानामुळे कसाेटी क्रिकेटसाठी चांगली वातावरण निर्मिती हाेईल. यासाठीचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा निर्णय अधिक पाेषक ठरणार अाहे.

कसाेटीला पुनर्प्रस्थापित करण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा उद्देश अाहे. यासाठी साैरव गांगुलीने काेलकात्यात कसाेटी सुरू हाेण्यापूर्वी घंटा वाजवण्याची परंपरा सुरू केली. गुलाबी चेंडूवर डे-नाइट कसाेटी अायाेजनालाही पसंती मिळत अाहे. बीसीसीअायवर नाराजी व्यक्त करणाऱ्या लाेढा समितीचा यावर काेणत्याही प्रकारचा अाक्षेप असू नये, अशी अाशा अाहे. यातुन कसाेटीला चांगले दिवस येतील. तसेच चाहत्या वर्गाचा अाकडाही वाढण्याची शक्यता अाहे.
बातम्या आणखी आहेत...