आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगात कोणत्याही खेळाडूपेक्षा सचिनवर सर्वाधिक दबाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेटसाठी हा आठवडा घडामोडींचा राहिला. युवराजसिंगचे दमदार पुनरागमन आणि चेतेश्वर पुजाराचे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आणखी एक त्रिशतक झाले. या दोन्ही घटना सचिनने निवृत्तीच्या घोषणेच्या प्रभावात दुर्लक्षित झाल्या. यासह सचिनच्या निवृत्तीची चर्चासुद्धा थांबली.


मागच्या 24 वर्षांत जे घडत आले, तेच या वेळीही घडले. सचिन सर्वांवर वरचढ ठरला. त्याच्या घोषणेने लोकांना आठवणींची शिदोरी उघडायला भाग पाडले. हुकसाठी एक प्रश्नसुद्धा पुढे आला की, असा खेळाडू पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दिसेल काय? ..सचिनच्या यशाकडे बघितले, तर ही चर्चा आश्चर्यकारक नाही.