आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकेमुळे विराट कोहलीने विचलित होऊ नये ‌! (अयाज मेमन)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक माजी क्रिकेटपटूंच्या टीकेमुळे विराट कोहली नाराज आहे. कारण या माजी क्रिकेटपटूंनी टीम इंडियाने द. आफ्रिकेविरुद्ध ३-० ने मिळवलेल्या विजयाला कमी लेखले. कोहलीच्या मते, आम्ही खेळातील तंत्र आणि आमच्या क्षमतेमुळे जिंकलो. मात्र, माजी खेळाडूंच्या मते खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्यामुळे भारतीय फिरकीपटूंना अतिरिक्त लाभ झाला आणि भारताचा विजय झाला. माझ्या मते, समीक्षक आपले काम करीत आहेत, तर खेळाडूंनीही आपले काम केले पाहिजे. टीकेने विचलित होऊ नये. तुम्ही कर्णधारपद भूषवत आहात, तर टीका सहन करावी लागणारच. टीकाकार काय म्हणत आहेत, याकडे लक्ष देण्याऐवजी विराट कोहलीने क्रिकेटचा आनंद लुटला पाहिजे.

कोहली एक गोष्ट विसरतोय की, मीडियामुळेच तो अंडर १९ पासून आतापर्यंत चर्चेत आहे. प्रशंसा आणि टीका करणे हे मीडियाचे कामच आहे. मीडिया आपली जबाबदारी पार पाडत आहे. कोण काय म्हणत आहे, यावर लक्ष देण्याऐवजी कोहलीने टीम इंडियाला कसोटीत नंबर वन बनवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. द. आफ्रिकेविरुद्ध ३-० अशा कसोटी विजयानंतर टीम इंडिया आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तानही आगेकूच करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, सर्वाधिक प्रतिभा टीम इंडियाकडे आहे. टीम इंडिया कोणत्याही टीमला आव्हान देण्यास सक्षम आहे. मागच्या १२ महिन्यांत टीम इंडियाच्या प्रदर्शनात सुधारणा होत आहे. ऑस्ट्रेलियाकडून आपला २-० ने पराभव झाला. मात्र, त्यानंतर भारताने श्रीलंकेला २-१ ने हरवले आणि आता द. आफ्रिकेला ३-० ने दणका दिला. विराट एक मजबूत फलंदाज तर आहेच. कर्णधार म्हणून त्याच्यातील गुण वेगाने विकसित होत आहेत. विराटचे फोकस खेळावरच असले पाहिजे. नकारात्मक उत्साह दाखवू नये.
टीम इंडियाच्या फलंदाजी आणि गोलंदाजीत मजबूत संतुलन आहे. फलंदाजीचे लाइनअप महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना जे होते, तेच आताही आहे.
बातम्या आणखी आहेत...