आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टाय’मुळे मालिकेत आला जिवंतपणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेटसाठी 25 जानेवारीचा दिवस आनंददायी ठरला. टीम इंडियाने ऑकलंड वनडेत शानदार प्रदर्शन करून न्यूझीलंडविरुद्ध सामना टाय करण्यात यश मिळवले. या टाय सामन्यामुळे मालिकेत जिवंतपणा आला आहे. आता दोन वनडे शिल्लक असून यात जोरदार संघर्ष पाहताना आनंद मिळेल. भारतीय क्रिकेटच्या हिशेबाने दुसरी आनंदाची बातमी म्हणजे महाराष्‍ट्राच्या विजय झोलला रणजी ट्रॉफी फायनलमध्ये खेळण्याची बीसीसीआयने परवानगी दिली आहे. झोल अंडर 19 वर्ल्डकपसाठी भारताचा कर्णधार आहे. वर्ल्डकपची तयारी सुरू असल्याने त्याला सुरुवातीला रणजी फायनलसाठी परवानगी मिळाली नव्हती. झोलने रणजी क्वार्टर फायनलमध्ये मॅच विजेता कामगिरी केली होती. महाराष्‍ट्र संघाला तो कोणत्याही परिस्थितीत प्लेइंग इलेव्हनमध्ये हवा आहे. अखेर महाराष्‍ट्राची इच्छा पूर्ण झाली.
मेहनतीने सामना टाय
मी आधीसुद्धा लिहिले आहे की, टीम इंडियाचा न्यूझीलंडचा दौरा इतका लहान आहे की, असे वाटते जणू काही भारतीय खेळाडू सहलीवर गेले आहेत. तिस-या वनडेत धोनी ब्रिगेडने अखेरपर्यंत झुंजार कामगिरी केल्याने मी आनंदित आहे. दबावात भारताने गुडघे टेकले नाहीत. रवींद्र जडेजा आणि आर. अश्विनने चेंडूऐवजी बॅटने कमालीची कामगिरी केली. टीम इंडियाने न्यूझीलंड दौ-यात दोन वनडे सामने गमावले आहेत. यापूर्वी आफ्रिकेतही वनडे आणि कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला. यामुळे धोनीच्या कमालीच्या नेतृत्वामुळेच टीम इंडियाने जबरदस्त पुनरागमन केले, असे आपण म्हणू शकतो. पहिल्या दोन वनडेत धोनी आणि विराट कोहलीने फलंदाजीत तर मो. शमीने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली होती. तिस-या वनडेत सातव्या आणि आठव्या क्रमांकाचे फलंदाज अश्विन आणि जडेजा यांनी बॅटने दम दाखवून भारतीय फलंदाजीत तळापर्यंत ताकद असल्याचे सिद्ध केले. सामना टाय झाल्याने स्वाभाविकपणे धोनी खुश असेल. आकडेवारीनुसार सलगपणे काही वनडेत भारताचा पराभव झाला आहे. अखेर आगामी 2015 च्या वर्ल्डकपचा विचार करता ज्यांची कामगिरी सुमार झाली आहे त्यांना बेंचवर बसवले पाहिजे.
रणजी ट्रॉफीचा विचार केला तर 29 जानेवारीपासून महाराष्‍ट्र-कर्नाटकात हैदराबाद येथे फायनल सामना होईल. विजय झोल सामन्याचा मुख्य आकर्षण असेल. गेल्या काही महिन्यांत झोलने ज्युनियर आणि सीनियर क्रिकेटमध्ये अर्धा डझन शतके ठोकली आहेत. रणजी ट्रॉफीच्या सुरुवातीला या सत्रात सचिनने हरियाणाविरुद्ध शतकाने सुरुवात केली होती. आता सत्राच्या अखेरीस (फायनल) कोणता खेळाडू शतक ठोकतो हे पाहणे रोमांचक ठरेल.
रणजीचे फायनल संपल्यानंतर आपण या महत्त्वपूर्ण देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेद्वारे किती खेळाडू टीम इंडियात प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर आहेत याबाबत विवेचन करूयात.