आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्जेंटिना फायनलमध्ये ; कांस्यपदकासाठी भारताचा इंग्लंडसोबत सामना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इपोह - येथील मैदानावर सुरू असलेल्या 21 व्या सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत शनिवारी अर्जेटिनाने यजमान मलेशियाला 1-0 ने धूळ चारत अंतिम फेरी गाठली. फायनलमध्ये अर्जेटिना-न्यूझीलंड सामना खेळवला जाईल. दुसरीकडे कांस्यपदकासाठी भारताची गाठ इंग्लंडशी पडणार आहे.
इंग्लंडने पाकवर 2-1 ने मात केली. शेवटच्या मिनिटाला विजयी गोल करून इंग्लंडने पाकवर निसटत्या विजयाची नोंद केली. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत खेळत होते. या धडाकेबाज विजयासह इंग्लंडने गुणतालिकेत दुस-या क्रमांकावर धडक मारली. दुस-या एका सामन्यात न्यूझीलंडला पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण कोरियाने एकतर्फी खेळी करत बलाढ्य न्यूझीलंडवर 1-0 ने विजय मिळवला. रंगतदार लढतीत दुस-या हाफमध्ये दक्षिण कोरियाने 1-0 ने आघाडी मिळवली. शेवटच्या मिनिटापर्यंत ही आघाडी राखून ठेवत कोरियाने
न्यूझीलंडला धूळ चारली.
मलेशियात होणार आशिया चषक
आंतरराष्टीय हॉकी स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन करणा-या मलेशियाला आगामी 2013 आशिया चषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे. 2014 मध्ये होत असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या पात्रतेसाठी ही स्पर्धा प्रतिष्ठेची मानली जाते. यंदा मोसमात मलेशियाला सलग दुस-यांदा मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. 2009 मध्येही इपोह येथे आशिया चषक हॉकी स्पर्धा खेळवली गेली होती. मलेशियामध्ये हॉकीसाठी निर्माण झालेल्या वातावरणामुळे आमचा उत्साह वाढला असल्याचे मत मलेशिया हॉकी फेडरेशनच्या सूत्रांनी मांडले आहे. आगामी वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या वेळापत्रकामध्ये मलेशियाच्या नावाचा उल्लेख आशिया हॉकी फेडरेशनने केला आहे.