आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK ची पहिली डे- नाईट टेस्ट: पिंक बॉलवर पहिले त्रिशतक, अजहर अलीच्या 302 धावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डे-नाईट टेस्टमध्ये पिंक बॉलवर सर्वाधिक नाबाद 302 धावा ठोकल्यानंतर अजहर अलीने असा सॅल्यूट ठोकला. - Divya Marathi
डे-नाईट टेस्टमध्ये पिंक बॉलवर सर्वाधिक नाबाद 302 धावा ठोकल्यानंतर अजहर अलीने असा सॅल्यूट ठोकला.
दुबई- पाकिस्तानचा सलामीवीर अजहर अलीने वेस्ट इंडिजविरूद्ध टेस्ट सीरीजमध्ये पहिल्या कसोटीत पहिल्या डावात नाबाद 302 धावा ठोकल्या. अजहर अली त्रिशतक ठोकणारा पाकिस्तानचा चौथा फलंदाज ठरला. अजहरने 469 चेंडूत त्रिशतक ठोकले. पाकिस्तानचा हा पहिलीच डे-नाईट टेस्ट आहे जी पिंक बॉलवर खेळली जात आहे. पाकिस्तानने 3 बाद 579 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला आहे. याला उत्तर देताना वेस्ट इंडिजने दुस-या दिवसअखेर एक बाद 69 धावा केल्या होत्या. पाकिस्तानने वेगाने काढल्या धावा...
- मॅचच्या दुस-या दिवशी पाकिस्तानने वेगाने धावा काढल्या. षटकामागे 4 या सरासरीने धावा काढत पाकने इंडिजवर दबाव वाढवला.
- अजहर अलीने आपल्या नाबाद 302 धावांच्या खेळीदरम्यान 23 चौकार आणि दोन षटकार मारले. तो एकून 11 तास खेळपट्टीवर ठाण मांडून होता.
- या त्रिशतकासह अजहर अली असा खेळाडू ठरला ज्याने डे-नाइट टेस्ट मॅचमध्ये एका डावात सर्वाधिक धावा केल्या.
- याआधी फक्त एकच डे-नाइट टेस्ट मॅच झाली ज्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला हरवले. त्या टेस्टमध्ये एकही शतक ठोकले गेले नव्हते.
- त्रिशतक ठोकताच अजहरने सॅल्यूट केले आणि पीचच्या पाया पडला.
हनीफ मोहम्मदचा विक्रम नाही मोडू शकला-
- अजहर पाकिस्तानकडून एका डावात सर्वाधिक धावा बनविणारा चौथा खेळाडू ठरला.
- 1958 मध्ये हनीफ मोहम्मद यांनी 337 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंजमाम उल हकने श्रीलंकेविरूद्ध 329 धावा केल्या होत्या. इंजमाम आता पाकिस्तानचा चीफ सिलेक्टर आहे.
- यानंतर यूनूस खानने 313 धावा केल्या आहेत.
अशी झाली पार्टनरशिप-
- पहिल्या विकेटसाठी अली आणि समी असलम यांच्यात 215 धावांची पार्टनरशिप झाली.
- पाकिस्तानकडून टेस्ट क्रिकेटमधील ही सर्वात मोठी चौथी पार्टनरशिप ठरली. असलमने 90 धावा केल्या.
- दुस-या विकेटसाठी असद शफीद आणि अजहर यांच्यात 137 धावांची पार्टनरशिप झाली. शफीदने 67 धावा केल्या.
- वेस्ट इंडिजविरूद्ध वन डे सीरीजमध्ये सलग तीन शतके ठोकणा-या बाबर आजमने 69 धावा केल्या.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, पाकिस्तानच्या डावा दरम्यानची क्षणचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...