आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईचे क्रिकेटपटू ठरले कमनशिबी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर दोनशेव्या कसोटीद्वारे क्रिकेटमधूनच निवृत्ती स्वीकारत असताना प्रत्येक मुंबईकर हा सोहळा नजरेत साठवण्यासाठी उत्सुक होता. मात्र, मुंबईचे उगवते क्रिकेटपटू आणि जे सचिनबरोबर खेळले असे रणजीपटू मुंबई संघाच्या रणजी सामन्यात अडकून पडले असल्याने सचिनचा अखेरचा सामना प्रत्यक्ष पाहणे शक्य न झाल्याने ते कमनशिबी ठरले.
अन्य कोणत्याही वेळी ते सर्व क्रिकेटपटू सचिनचा हा सामना पाहून त्याला सलाम करण्यासाठी नक्कीच वानखेडेवर आले असते. मात्र, तसे घडले नाही. कारण सध्या मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ‘अ’ गटात असलेला मुंबईचा विद्यमान रणजी संघ दिल्लीसमवेत सामना खेळत आहे.
युवा सिद्धेश लाड ( 74), कसोटीपटू वासिम जाफर (61 )आणि सलामीवीर आदित्य तारे (53 ) यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्या दिल्ली संघाविरुद्ध दमदार अर्धशतकी खेळी करीत दिल्लीपुढे आव्हान उभे केले आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स वानखेडेपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असून ते सध्या जगभरातील क्रि केटप्रेमींच्या औत्सुक्याचे केंद्र ठरले आहे. त्या रणजी सामन्यात सचिनबरोबर आतापर्यंत खेळत असलेला सलामीवीर वीरेंद्र सेहवाग दिल्लीच्या रणजी संघाकडून आणि मुंबईच्या रणजी संघाचा कप्तान झहीर खानही खेळत आहेत. मात्र, तेदेखील सचिनच्या अखेरच्या सामन्यापासून वंचित राहिले असून स्वत:च्या खेळावरच लक्ष केंद्रित करीत आहेत.
दुर्दैवाने सेहवाग व जहीर यांनाही बीसीसीआयने त्यांच्या वार्षिक करारातून वगळले असून सचिन शेवटची कसोटी खेळत असतानाही त्याला करारात अंतर्भूत करण्यात आले आहे. सचिन तर धोनी, विराट आणि अश्विनसह एक कोटी रुपयांच्या मानधनासह करारात ‘अ’ श्रेणीत स्थान टिकवून आहे.