आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Badminton: Kashyap, Prannoy Breeze Into Quarters Of Singapore Open

कश्यपची घोडदौड कायम, प्रणयची माघार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूर - राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यपने सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेतही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी सुरूच ठेवली आहे. शुक्रवारी फ्रान्सच्या लेव्हेरडेजला अवघ्या ३० मिनिटांत धूळ चारत कश्यपने या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र, भारताचा अन्य खेळाडू एच. एस. प्रणयचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. जपानच्या मोमोटाविरुद्धच्या लढतीत त्याने माघार घेतली.

दरम्यान, शुक्रवारी पी.कश्यपने फ्रान्सच्या ब्राइस लेव्हेरडेजला सुरुवातीपासूनच आपल्या जाळ्यात अडकवून ठेवले. पहिला सेट तब्बल २१-६ च्या फरकाने काबीज करत कश्यपने त्याचा आक्रमकपणा जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या सेटमध्ये लेव्हेरडेज मुसंडी मारेल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार त्याने पुनरागमन केलेही.परंतु, कश्यपने त्याच्या या अपेक्षेवर पाणी फेरून टाकले. कश्यपने दुसरा सेट २१-१७ च्या फरकाने जिंकत पुढच्या फेरीचे तिकिट मिळवले. उपांत्य फेरीत त्याचा सामना हाँगकाँगच्या हू यूनशी होईल. हू यूनने उपउपांत्य फेरीत चीनच्या तियान हुवेईचा १७-२१, २१-१८, २१-१० अशा फरकाने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.