आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टाईलमध्ये ज्वाला गुट्टाला कमी नाही तिची पार्टनर, कोर्टबाहेर असा असतो अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा (लाल घे-यात) - Divya Marathi
ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा (लाल घे-यात)
स्पोर्ट्स डेस्क- सायना नेहवाल, पी व्ही सिंधी आणि ज्वाला गुट्टा यांच्यानंतर आणखी एक स्टार इंडियन शटलर म्हणजे अश्विनी पोनप्पा. 18 सप्टेंबर रोजी 27 वर्षाची झालेली अश्विनी, ज्वाला गुट्टाची जोडीदार आहे. ज्वाला जेथे खेळ आणि वादामुळे चर्चेत राहते तेथे मात्र अश्विनी कोर्टाबाहेर जाताच की गायब होते. ती सोशल साईट्सवर आहे पण फार अॅक्टिव नाही. स्वत: ट्वीट करण्यापेक्षा ती ज्वालाचीच ट्वीट्स री-ट्वीट करणे पसंत करते. 12 व्या वर्षी बनली होती चॅम्पियन, स्मॅशला घाबरतात विरोधी...
- अश्विनीचे पिता नॅशनल हॉकी खेळाडू राहिले आहेत. त्यामुळे तिच्या रक्तातच खेळ आहे. लहानपणी ती हायपरअॅक्टिव होती.
- 8 व्या वर्षी तिने बॅडमिंटनचे रॅकेट हातात धरले. 12 व्या ती जूनियर नॅशनल चॅम्पियन बनली.
- अश्विनीने 2010 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 240 किमी प्रतितासी वेगाने स्मॅश मारला. तेव्हा हा विश्व विक्रम बनला होता.
- मात्र, नंतर चीनच्या हुआंग सुई (257 किमी प्रतितासी) ने नंतर हा विक्रम मोडला.
ज्वालासोबत जोडी सुपरहिट-
- अश्विनीने 2006 मध्ये सैफ गेम्समध्ये गोल्ड जिंकले. मात्र तिला खरी ओळख 2009 मध्ये ज्वाला सोबत जोडी बनविल्यानंतरच मिळाली.
- या जोडीने 2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड आणि 2011 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य जिंकले होते.
चॉकलेट आहे कमजोरी-
- पोनप्पाला गीत-संगीत, फिल्म पाहणे, पुस्तक वाचणे पसंत आहे. चॉकलेट तिची कमजोरी आहे.
- तिच्या किटमध्ये नेहमीच फेस क्रीम असते. ‘प्रत्येक दिवस नविन दिवस आहे. रोज नव्याने सुरुवात करायची आहे’, हा तिचा जीवन जगण्याचा फंडा आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कोर्टवर सिंपल दिसणारी अश्विनी पोनप्पाचा ऑफ द फील्ड कसा असतो अंदाज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...