सिडनी - जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेली सायना नेहवाल व सिंधूने गुरुवारी ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सायनाने जागतिक क्रमवारीत आठवे स्थान गाठले.
सहाव्या मानांकित सायना नेहवालने भारताच्या तुलसीचा पराभव केला. तिने लढतीत 21-18, 21-11 ने विजय मिळवला. पुरुष दुहेरीत प्रणव चोप्रा आणि अक्षय देवालकरला कोरियाचा सुंग ह्यान को आणि बाइक चोइल शिनने 21-13, 21-19 ने धूळ चारली.
साईप्रणीत बाहेर : भारताचा युवा खेळाडू साईप्रणीतला पुरुष एकेरीत गुरुवारी परभवाचा सामना करावा लागला. त्याला सहाव्या मानांकित झेंगमिंग वांगने 31 मिनिटांत पराभूत केले. चीनच्या वांगने 21-13, 21-17 असा विजय मिळवला.
31 मिनिटांत सिंधू विजयी : आठव्या मानांकित सिंधूने गुरुवारी स्पर्धेत अवघ्या 31 मिनिटांत सरळ दोन गेममध्ये विजय मिळवला. तिने महिला एकेरीच्या लढतीत थायलंडच्या निचाओन जिंदापोनला पराभूत केले. भारताच्या सिंधूने 21-13, 21-7 अशा फरकाने सामना जिंकला.