आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरू संघातील ख्रिस गेलचे ‘चॅलेंज’ कायम!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली । झंझावाती फलंदाजीच्या जोरावर सर्वाधिक धावांचा विक्रमी पल्ला गाठून गतवर्षीची आयपीएल टी-20 स्पर्धा गाजवून सोडणा-या ख्रिस गेलला बंगळुरू संघाने दोन वर्षांसाठी संघामध्ये कायम केले आहे. येत्या दोन सत्रांच्या आयपीएल टी-20 स्पर्धेसाठी आता ख्रिस गेल बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स संघाकडून खेळणार असल्याची माहिती संघाचे संचालक सिद्धार्थ माल्या यांनी दिली.
येत्या एप्रिल महिन्यात पाचव्या सत्राच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या महासंग्रामाला सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या अदलाबदलीची प्रक्रिया शुक्रवारी बंद झाली. त्यामुळे बंगळुरू संघाने गेल्या मोसमात चमकदार कामगिरी करणा-या ख्रिस गेलला संघात कायम ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
मागच्या वर्षी ख्रिस गेल याला गोलंदाज डिर्क नैन्सच्या जागी संघामध्ये सहभागी केले होते. ‘मला बंगळुरू संघाकडून मागच्या वर्षी चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन करता आले. त्यामुळे आगामी स्पर्धेतही या कामगिरीची लय कायम ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. या संघातील सर्वांच्या सहकार्यामुळे मला मागच्या वर्षी मनसोक्त फलंदाजीचा आनंद घेत सर्वाधिक धावा काढता आल्याची प्रतिक्रिया गेल याने दिली.