आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bajarang To Silver And Narsing To Bronz In Asian Games, Divya Marathi

कुस्तीमध्ये बजरंगला रौप्य, नरसिंगला कांस्य'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योगेश्वर दत्तच्या सुवर्ण कामगिरीनंतर भारतीय मल्ल बजरंग आणि नरसिंग यादव यांनी इंचियोन एशियाड क्रीडा स्पर्धेतील फ्रीस्टाइल कुस्तीत सोमवारी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदके जिंकली. बजरंगने ६१ किलो वजन गटातील फ्रीस्टाइल कुस्तीत रौप्य तर नरसिंगने ७४ किलो वजन गटात कांस्यपदक जिंकले. यापूर्वी भारताने महिला गटात दोन कांस्यपदके मिळवली.

योगेश्वरसोबत महाबली सतपाल यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रसाल स्टेडियमवर सराव करणा-या बजरंगने सेमीफायनलमध्ये जपानच्या नोरियुकी तकासुकाला संघर्षपूर्ण लढतीत हरवले. दमदार प्रदर्शन करून त्याने फायनलमध्ये धडक दिली.

पहिल्या फेरीत बजरंग मागे
विश्व कुस्ती स्पर्धेतील कांस्यपदक विजेता मल्ल बजरंग पहिल्या फेरीत ०-२ ने मागे पडला होता. मात्र, दुस-या फेरीत त्याने वेगाने इराणी मल्लावर पकड घेताना गुण मिळवले. मसूदने प्रत्युत्तरात प्रहार केला आणि दोन गुण घेत ४-२ ने आघाडी घेतली. बजरंगने आपली पूर्ण शक्ती पणाला लावताना ४-४ असा बरोबरीचा स्कोअर केला. त्याने सामना संपेपर्यंत हा स्कोअर कायम ठेवला. शेवटच्या काही सेकंदांत इराणच्या मल्लाने दोन गुण मिळवले आणि बजरंगचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले. बजरंगला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.

नरसिंग यादवही चमकला
नरसिंग आणि शिमादा यांच्यात ७४ किलो वजन गटात कांस्यपदकाची लढत जबरदस्त झाली. हा सामना ५-५ असा बरोबरीत असताना भारताचे अपील धुडकावण्यात आले. शिमादाच्या वाट्याला दोन गुण आले. शिमादा ७-५ ने पुढे होता. मात्र, नरसिंगने १०-७ ने सामना जिंकत कांस्य मिळवले.