आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bajrang Hat Trick In The Asian Games, Latest News In Marathi

आशियाई स्‍पर्धेमध्‍ये पदकांची हॅट्रिक करणारा बजरंग अजूनही नोकरीपासून वंचित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
17 व्‍या आशियाई स्‍पर्धेमध्‍ये भारताला कांस्‍य पदक पटकावून देणा-या बजरंगने खरे म्‍हणजे पदकांची हॅट्रिक केली. परंतु आजही सरकारी मदत त्‍याला मिळाली नाही. जाणून घ्‍या या नौकानयनपटूविषयी.

बजरंग तसा राज्‍यस्‍थानचा. त्‍याने भारतासाठी आशियाई खेळांमध्‍ये हॅट्रिक केली आहे. 2006 मध्‍ये रौप्‍य, 2010 मध्‍ये सुवर्ण आणि यावर्षी कांस्‍य पदकाची कमाई केली आहे.

बजरंगने भारतासाठी आशियाई खेळाच्‍या सहाव्‍या दिवशी पुरुषांच्‍या एकेरी प्रकारात कास्‍य पदक मिळविले. ऐट फायनल स्‍पर्धेमध्‍ये भारताच्‍या बजरंग लाला ताखर, कपिल शर्मा, रंजीत सिंह, रॉबिन उलाहनन, सावन कुमार, मोहम्‍मद आझाद, मनिंदर सिंह, दविंदर सिंह आणि मोहम्‍मद अहमद या संघाने 51.84 सेकंदामध्‍ये अंतर पूर्ण केले होते. तर चीनने सुवर्ण आणि जपानने रौप्‍य पदक पटकाविले.
चार वर्षांनंतरही नाही मिळाली नोकरी
बजरंगला आशियाई स्‍पर्धेमध्‍ये पदक मिळाल्‍याचा आनंद त्‍याच्‍या कुटिंबियांना आहे. परंतु चार वर्षांपासून शासनाने द‍ेवू केलेली डीएसपी पदाची नोकरी अद्याप न मिळाल्‍याने तेवढे दु:ख आहे.

बजरंगच्‍या भावाने सांगितले की,' जेव्‍हा बजरंगने 2010 मध्‍ये आशियाई स्‍पर्धेत रौप्‍य पदकाची कमाई केली होती. त्‍यावेळी राज्‍य सरकारने त्‍याला पोलिस विभागात डीसएपी पदाची नोकरी बहाल केली. परंतु अद्यापही त्‍या नोकरीचा लाभ त्‍याला झाला नाही. 2015 मध्‍ये तो सेवानिवृत्त होणार आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, बजरंग ताखरची छा‍याचित्रे...