आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Second Death Anniversary News In Marathi

राजकारणाच्या खेळपट्टीवर खेळू नकोस..सचिनला दिला होता सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका पत्रकार परिषदेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला एका पत्रकाराने मुंबई ही फक्त मराठी भाषकांची आहे काय? असा प्रश्न विचारला होता. त्या वेळी सचिन म्हणाला, ‘मुंबई ही सर्व भारतीयांची आहे.’ सचिनच्या या विधानानंतर बाळासाहेबांनी त्याला ‘राजकारणाच्या खेळपट्टीवर खेळू नकोस..क्रिकेटच्या खेळपट्टीवरच खेळ,’ असा सल्ला होता.
या प्रकरणानंतर दोघांत दुरावा निर्माण झाला. सचिनच्या अनेक विक्रमांच्या कामगिरीचे कौतुक म्हणून मुंबई महानगरपालिकेने त्याचा जाहीर सत्कार करण्याचा ठराव घेतला होता. त्या वेळी मुंबई मनपावर शिवसेनेचीच सत्ता होती. मनपाने सत्कारासाठी सचिनला वेळही मागितला. मात्र, त्याने प्रत्युत्तर न दिल्याने अखेर हा सत्काराचा प्रस्तावच रद्द करण्यात आला. सचिन राज्यसभेवर खासदार म्हणून गेला त्या वेळी बाळासाहेबांनी हा काँग्रेसचा डाव असल्याचे म्हटले होते. सचिन संसदेत काय करणार? असा प्रश्नही त्यांनी विचारला होता.

भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये शोककळा
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्धी माध्यमांद्वारे प्रसिद्ध झाले त्या वेळी भारत-इंग्लंड यांच्यातील अहमदाबाद येथे सुरू असलेला क्रिकेट कसोटी सामना सुरू होता. तिस-या दिवसाचा खेळ थांबला. खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये दाखल झाले. भारतीय ड्रेसिंग रूममध्ये सर्व खेळाडू येताक्षणीच सचिन तेडुलकरने सर्वांना बाळासाहेबांच्या निधनाची बातमी सांगितली. बाळासाहेबांना मानणा-या व ओळखणा-या चेह-यांवर त्या वेळी दु:ख पसरले.
पुढील स्लाईडवर पाहा बाळासाहेब ठाकरे आणि सचिनचा एक दुर्मिळ फोटो...