आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कॉटलंडविरुद्ध वेस्ट इंडीजचा पराभव टळला, आयर्लंडने दाखवली आपली ताकद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेचा उद्‌घाटन सोहळा न्यूझीलंडमध्ये रंगला असला तरी, तत्‍पूर्वी ऑस्ट्रेलियात आयर्लंड संघाने सराव सामन्यात बांगलादेशला हरविले, तर वेस्ट इंडीजला स्कॉटलंडने चांगलेच झुंजविले. लिंबूटिंबू समजल्‍या जाणा-या या देशांनी आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. त्‍यामुळे या विश्‍वचषकाचे प्रबळ दावेदार कोण हे सांगने कठीण आहे.
इंडीजचा पराभव टळला
वेस्ट इंडीज संघाला विश्वचषकाच्या सराव सामन्यात स्कॉटलंडविरुद्ध मोठी झुंज देऊन विजय मिळवावा लागला. विंडीजने गुरुवारी प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 313 धावा काढल्या होत्या. संघाकडून यष्टिरक्षक फलंदाज दिनेश रामदीनने सर्वाधिक ८८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात स्कॉटलंड संघाने नऊ गड्यांच्या मोबदल्यात ३१० धावा काढल्या. विंडीजने असा ३ धावांनी विजय मिळवला. स्कॉटलंडसाठी काइट कोटूजरने सर्वाधिक ९६ धावांची खेळी केली. संघाने शेवटच्या चार विकेट सात धावांच्या अंतराने गमावल्या.
आयर्लंडने दाखवली आपली ताकद
आयर्लंड संघाने गुरुवारी सराव सामन्यात बांगलादेशला हरवून आपली ताकद दाखवून दिली. या संघाने चार गड्यांनी सामना जिंकला. आयर्लंडने प्रथम गाेलंदाजी करताना बांगलादेशला ४८.२ षटकांत १८९ धावांत रोखले. प्रत्युत्तरात या संघाने ४६.५ षटकांत सहा गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. संघासाठी अँड्रयू बारबिनाईने नाबाद ६३ धावा काढल्या. विश्वचषकात आयर्लंडचा पहिला सामना १६ फेब्रुवारी रोजी विंडीजविरुद्ध होईल.
पुढील स्‍लाइडवर पाहा, विश्‍वचषाकचे वेळापत्रक..