आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीकेएसपीत दडले बांगलादेश क्रिकेटच्या यशाचे रहस्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - बांगलादेशला आशियाई क्रिकेटचा बादशाह संबोधल्यास चुकीचे ठरणार नाही. त्यांनी पहिल्यांदा पाकिस्तान आणि भारताला धूळ चारून हे सिद्ध केले आहे. बांगलादेशच्या यशात बीकेएसपीचे मोठे योगदान आहे. बांगलादेश संघात आतापर्यंत २० पेक्षा जास्त खेळाडू दिलेल्या बांगलादेश क्रीडा शिक्षण प्रतिष्ठान(बीकेएसपी) बांगलादेशचे युवा मंत्रालय संचलित करते. त्यास बांगलादेश क्रिकेट मंडळाची मान्यता मिळालेली आहे.

बीकेएसपीमध्ये मुख्य विदेशी क्रिकेट प्रशिक्षक म्हणून आठ वर्षे काम केलेल्या चंदिगडच्या मनजित सिंह यांनी बांगलादेशला एक कमकुवत संघातून बळकट संघ बनवले. मनजित सिंह म्हणाले, सध्याच्या संघात खेळणारे शाकिब उल हसन, सौम्या सरकार, लिट्टन दास, नासिर मोहंमद, मुशफिकूर रहमान आणि मोमिनुल यासारखे खेळाडू याच केंद्राची देण आहे. मनजित यांनी या सर्व खेळाडूंना प्रशिक्षण दिले. ही एक प्रकारची क्रीडा संस्था आहे. बीकेएसपी बांगलादेशची राजधानी ढाकापासून ४० किमी अंतरावर सावर नावाच्या ठिकाणी आहे.
बातम्या आणखी आहेत...