आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलासमाेर अाज अफगाणचे अाव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनबेरा- अफगाणिस्तानचा संघ बुधवारी विश्वचषकातील अापल्या पहिल्या सामन्यात विजयी मंत्रासह मैदानावर उतरणार अाहे. बांगलादेशविरुद्ध सामन्यात आपली विजयी लय कायम ठेवण्यासाठी अफगाणिस्तान संघ उत्सुक अाहे. गतवर्षीच्या मार्च महिन्यातील अाशिया चषकात एका सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा ३२ धावांनी पराभव केला हाेता. दाेन्ही संघ अातापर्यंत एकाच लढतीत समाेरासमाेर अाले अाहेत.
बांगलादेश संघाने मागील अडीच महिन्यांपासून काेणताही अांतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला नाही. याची उणीव भरून काढण्यासाठी संघातील खेळाडू वर्ल्डकपच्या पहिल्या दिवसापर्यंत कसून सराव करताना दिसून अाले. अफगाणिस्तानचा संघ प्रथमच विश्वचषकात खेळत अाहे. दाेन्ही संघ स्वत: सक्षम असल्याचे सिद्ध करण्यासाठी मैदानावर उतरणार अाहे. बांगलादेशचा कर्णधार मुशर्रफ मुर्तझा सध्या दुखापतीने त्रस्त अाहे. त्यामुळे शाकीब-अल-हसन अाणि माेमिनूल हक यांच्यावर संघाची मदार असेल.