आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangladesh All Rounder Sohag Gazi Record: Made One Century, Hattric In Ond Test

बांगलादेशचा ऑलराउंडर सोहाग गाजीचा विक्रम: एकच कसोटीत शतक, हॅट्ट्रिक नोंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चितगांव - बांगलादेशचा ऑलराउंडर सोहाग गाजीने एकाच कसोटीत शतक आणि हॅट्ट्रिक करण्याचा अपूर्व विक्रम केला. कसोटीच्या 136 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा गाजी जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला.


बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी अनिर्णीत राहिली. या कसोटीत चार शतके झळकली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 469 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने 501 धावांची खेळी केली. त्यानंतर किंवींनी 7 बाद 287 धावांवर दुसरा डाव घोषित केला. यासह न्यूझीलंडने प्रतिस्पर्धी टीमसमोर 45 षटकांत 256 धावांचे लक्ष्य ठेवले होते. बांगलादेशने तीन गडी गमावून 173 धावांपर्र्यंत मजल मारली.