आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bangladesh Cricketer Mohammad Ashraful Banned In Match Fixing, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बांगलादेशचा माजी कर्णधार अश्रफुलवर मॅस फिक्सिंगचा आरोप, 8 वर्षांची बंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अश्रफुलवर मॅच फिक्सिंगच्‍या आरोपामुळे 8 वर्षांची बंदी घालण्‍यात आली आहे. बांगलादेश प्रीमियर लीगच्‍या (बीपीएल) अँटी करप्‍शन ट्रिब्‍यूनलने अश्रफुलला स्‍पॉट फिक्सिंग आणि मॅच फिक्सिंगमध्‍ये दोषी आढळ्याने ही कारवाई केली आहे
.
2013 च्‍या बीपीएलमध्‍ये अश्रफुलवर मॅच फिक्सिंगचा आरोप होता. तसेच ढाका ग्‍लॅडिऐटरर्सच्‍या मॅनेजिंग डायरेक्‍टर शिहाब चौधरीलाही या केसमध्‍ये शिक्षा झाली आहे. चौधरीवर 10 वर्षांचा प्रतिबंध घालण्‍यात आला आहे. याशिवाय किवी फलंदाज लू विंसेंटला तीन वर्षे आणि श्रीलंकेच्‍या कौशल लोकुरारिचीवर 18 महिन्‍याची बंदी घालण्‍यात आली आहे.
उल्‍लेखनिय म्‍हणजे लू विसेंटने त्‍याच्‍यावरील आरोप मान्‍यही केले आहेत.
न्‍यायमुर्ती खादेमुल इस्‍लाम यांच्‍या अध्यक्षतेखाली खेळाडूंवर प्रतिबंध घालण्‍यात आला आहे.
अश्रफुलवरील आरोप पुढील प्रमाणे
* बीपीएलमधील चार सामने फिक्‍स करणे. त्‍यामधील दोन सामन्‍यामध्‍ये तो स्‍वत: खेळला होता.
* ढाका ग्‍लॅडिएटर्स विरुध्‍द चटगाव किंग्‍ज या सामन्‍यामध्‍ये फिक्सिंगच्‍या आरोपामध्‍ये त्‍याला 7.70 लाख रुपयाचा दंड भरावा लागणार आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा अश्रफुलची कामगिरी