आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangladesh Cricketer Shakib Al Hasan Birthday News In Marathi

B\'DAY SPCL: भाडेतत्त्वावर क्रिकेटपटू म्‍हणून खेळत होता शाकीब; आता बनला वर्ल्‍ड नं.1

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांगलादेशचा अष्‍टपैलू खेळाडू 'शाकिब'चा आज 27 वा वाढदिवस आहे. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्‍ये 100 हून अधिक विकेट आणि 2000 हून अधिक धावा बनविणारा शाकिब टी-20 प्रकारात आपल्‍या दिमाखदार खेळीचा प्रत्‍यय देत आहे. हॉगकांग विरूध्‍द खेळल्‍या गेलेल्‍या उपांत्‍यपूर्व सामन्‍यामध्‍ये त्‍याने 9 धावा देत 3 खेळाडूंना बाद केले. एवढेच नाही तर, आशिया चषकामध्‍ये पाकिस्‍तानसोबत झालेल्‍या सामन्‍यामध्‍ये त्‍याने 44 धावांची नाबाद खेळी साकारली होती. तर याचा सामन्‍यात कर्णधार मिस्‍बाह उल हक याची मौलिक विकेटही घेतली होती.

ICC रॅकिंगमध्‍ये पहिली जागा पटकाविणारा शाकिब पहिला बांगलादेशी खेळाडू ठरला आहे. 2011 मध्‍ये त्‍याने ICC च्‍या कसोटी क्रिकेटप्रकारात अष्‍टपैलू खेळाडू म्‍हणून अव्‍वल स्‍थान पटकाविले होते.

भाडेतत्त्‍वावर खेळायचा शाकिब
'प्रथम आलो' या बांगलादेशी वृत्‍तपत्राच्‍या संपादकाने आपल्‍या लेखामध्‍ये शाकिबच्‍या पूर्व जीवनाचे चित्र शब्दबध्‍द केले आहे. लहानपणापासून शाकिब भाडेतत्त्वावर वेगवेगळ्या गावी क्रिकेट खेळत होता. ग्रामीण भागामध्‍ये झालेल्‍या सामन्‍यामध्‍ये त्‍याच्‍या खेळीने पंच प्रभावित झाले. आणि पंचांनीच त्‍याला इस्‍लामपूरा पारा क्‍लबमध्‍ये पाठविले. बांगलादेशी मागुरा क्रिकेट लीगमध्‍ये त्‍याने आपल्‍या करिअरला सुरुवात केली.

इस्‍लामपूरा क्‍लबकडून खेळताना शाकिबने पहिल्‍याच चेंडूमध्‍ये विकेट मिळविली होती. त्‍याची खेळातील कसब पाहून त्‍याला बांगलादेश क्रीडा प्रतिष्‍ठान (सरकारी स्‍पोर्ट्स इंस्‍टीट्युट) मध्‍ये 6 महिन्‍याचे प्रशिक्ष्‍ाण्‍ाही मिळाले होते.

पुढील स्‍लाइडवर पाहा, शाकिबच्‍या जीवनप्रवासाची छायाचित्रे...