खुलना (बांगलादेश)- बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात आता बांगलादेशचा ओपनर तमीम इक्बालने डबल सेंचुरी झळकावली आहे. करिअरची त्याची ही पहिली डबल सेंचुरी आहे. 206 धावा केल्यावर तमीम इक्बाल आऊट झाला.
यापूर्वी याच कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या महंमद हाफिजने करिअरची डबल सेंचुरी (224 रन) केली होती. या बळावर पाकिस्तानने पहिल्या डावात 628 धावांचा स्कोअर उभा केला होता. त्यात 296 धावांची आघाडी घेतली होती.
तमीमने मारले 17 फोर आणि 7 सिक्सर
पाकिस्तानने दिलेले आव्हान स्वीकारताना बांगलादेशी फलंदाजांनी चांगली सुरवात केली. त्यात तमीम इक्बालने 206 धावा केल्या. इक्बालचा यापूर्वी बेस्ट स्कोअर 151 धावा होता. जानेवारी 2010 मध्ये भारताविरुद्ध खेळताना त्याने हा स्कोअर केला होता. पाकिस्तानविरुद्ध डबल सेंचुरी झळकावताना त्याने 17 फोर आणि 7 सिक्सर लगावले. त्याने इमरुल कायससोबत मिळून धावफलकाला 312 धावा जोडल्या. आता हा सामना ड्रॉ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रेकॉर्ड ओपनिंग पार्टनरशीप
तमीम आणि इमरुल यांनी बांगलादेशकडून ओपनिंग पार्टनरशीपचा रेकॉर्ड केला आहे. चौथ्या दिवशी दोघांनी पहिल्या विकेटसाठी 273 धावा केल्या. यावेळी तमीम 138 तर इमरुल 132 धावांवर नॉटआऊट होते. इमरुल याने 150 धावा जोडल्या.
पुढील स्लाईडवर बघा, या ऐतिहासिक सामन्याचे रोमांचक फोटो....