आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangladesh Tour: Isha Sodhi, Kore Anderson In New Zealand Team

बांगलादेश दौरा : ईश सोधी, कोरे अँडरसन न्यूझीलंड कसोटी संघात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेलिंग्टन - न्यूझीलंड संघ पुढच्या महिन्यात बांगलादेश दौरा करणार आहे. यासाठी शुक्रवारी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली. या दौ-यातील कसोटीसाठी लेगस्पिनर ईश सोधी व ऑलराउंडर कोरे अँडरसनला संघात स्थान मिळाले आहे.


लुधियानात जन्मलेला सोधी सध्या भारतीय अ संघाविरुद्ध तीनदिवसीय सामन्यासाठी विशाखापट्टणम येथे आला आहे. तसेच या दौ-यात अँडरसनला आंतरराष्‍ट्रीय कसोटीत पदार्पण करण्याची संधी आहे. बी. मॅक्ल्युमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा संघ दौ-यात दोन कसोटी, तीन वन डे आणि एक टी-20 सामना खेळणार आहे.
विशाखापट्टणम येथे सोढीने दुस-या तीनदिवसीय सामन्यात भारताविरुद्ध 57 धावांची सुरेख खेळी केली. त्याने आतापर्यंत 12 प्रथम श्रेणी सामन्यांत न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व केले.