आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशी अंपायर नादीर शहावर दहा वर्षांची बंदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका- बांगलादेश क्रिकेट मंडळाने (बीसीबी) पंच नादीर शहावर दहा वर्षांच्या बंदीची कारवाई केली. गेल्या वर्षी भारताच्या एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये शहाने आर्थिक गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणाची बीसीबीने सखोल चौकशी केली. आरोप सिद्ध झाल्यानंतर क्रिकेट मंडळाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

या वृत्तवाहिनीने 2012 मध्ये बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानच्या पंचांनी निर्णय घेण्यासाठी पैसे घेतल्याचे स्टिंग ऑपरेशनमध्ये दाखवले होते. त्यानंतर तिन्ही देशांच्या क्रिकेट मंडळाने पंचांवर कारवाई करण्याची घोषणा केली होती.