आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडिया बांगलादेशात; उद्यापासून कसाेटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - एक कसोटी आणि तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया सोमवारी बांगलादेशला पोहोचली. विमानतळावर टीम इंडियाचे भव्य स्वागत करण्यात आले. कसोटी कर्णधार कोहलीसोबत हरभजनसिंग विमानतळावर दिसला. विराटच्या आग्रहानंतरच हरभजनचे कसोटी संघात पुनरागमन झाले, हे विशेष.

१० जूनपासून कसोटी सामना
दोन्ही देशांदरम्यान मालिकेत केवळ एक कसोटी सामना होणार आहे. या कसोटीला १० जूनपासून सुरुवात होईल. टीम इंडिया आपल्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार एक दिवस उशिरा येथे पोहोचली आहे. टीम इंडियाला ठरलेल्या कार्यक्रमानुसार ७ जून रेाजी येथे पोहोचायचे होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी दोनदिवसीय बांगलादेश दौऱ्यावर असल्याने सुरक्षा एजन्सीने टीम इंडियाला सुरक्षा देण्यास असमर्थता दर्शवली. यामुळे भारतीय संघाला एक दिवस उशिरा यावे लागले.
धोनीच्या निवृत्तीनंतर कोहलीची पहिली "कसोटी' : ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर धोनीशिवाय खेळण्याची टीम इंडियाची आणि विराट कोहलीची ही पहिलीच वेळ असेल. ऑस्ट्रेलियाच्या प्रदीर्घ दौऱ्यात टीम इंडियाने चार कसोटी सामने खेळले. भारताने मालिका २-० ने गमावली. दुखापतीमुळे धोनी पहिल्या कसोटीत खेळू शकला नव्हता.
भज्जी चमकू शकतो
खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी अनुकूल आहेत. यामुळे भज्जीचे पुनरागमन सुखद ठरू शकते. अश्विनही खेळला तर हरभजन-अश्विनची फिरकी जोडी निर्णायक ठरू शकते. सोबत डावखूरा जडेजाही असेल.
दौरा कठीण
गेल्या १५ वर्षांत भारताचा हा दौरा कठीण मानला जात आहे. कारण नुकत्याच झालेल्या मालिकेत बांगलादेशने टीमने पाकिस्तानला वनडे मालिकेत ३-० ने आणि टी-२० मालिकेत १-० ने हरवले होते. कसोटीत पाकिस्तानने १-० ने विजय मिळवला होता, मात्र बांगलादेशच्या टीमने जबरदस्त संघर्ष केला होता.

ढाका येथे पोहोचल्यानंतर सोमवारी कर्णधार कोहलीसह टीम इंडियाच्या खेळाडूंनी सराव केला.