आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangladesh West Indies Test Match News In Marathi, Divya Marathi

कसोटी: रोचचे तुफान; बांगलादेश अडचणीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेंट लुसिया - केमार रोचच्या तुफानी गोलंदाजीने बांगलादेशची पहिल्याच डावात पार वाताहत झाली असून दिवस अखेर त्यांची अवस्था ७ बाद १०४ धावा अशी झाली होती. विंडीजच्या सर्वबाद ३४० या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना रोचने ५ बळी घेत बांगलादेशच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडून टाकले. दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोचने अवघ्या ३३ धावा देत हे पाच बळी पटकावल्याने बांगलादेशपुढे फॉलोऑन वाचवण्याचे संकट उभे राहिले आहे.
त्याला जेरोमी टेलरने दमदार साथ देत दोन बळी मिळवल्याने बांगलादेशचा संघ संकटात सापडला आहे. बांगलादेशकडून केवळ तमीम इक्बाल याने ४८ धावांची चविट खेळी केली. मात्र, त्याला दुसऱ्या टोकाकडून एकाही फलंदाजाने साथ दिली नाही. तमीमदेखील रोचच्या गोलंदाजीवर विकेटकीपरकडे झेल देऊन बाद झाला. त्यामुळे आता सामन्याच्या तिसऱ्या दविशी बांगलादेशपुढे तीन गड्यांमधून किमान ७६ धावा करीत फॉलोऑन वाचवणे आणि विंडीजचा लीड शक्य तितका कमी करण्याचे आव्हान राहणार आहे.

चंदरपॉलने लढवला किल्ला
त्याआधी विंडीजच्या पहिल्या डावात शविनारायण चंदरपॉलने एका बाजूने किल्ला लढवत केलेल्या ८४ धावांमुळेच विंडीजचा संघ साडेतीनशेच्या आसपास धावसंख्या उभी करू शकला. त्याला दुसऱ्या बाजूने डॅरेन ब्राव्होने चांगली साथ दिल्याने चौथ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारीदेखील उभी राहू शकली. पहिल्या दविसअखेर ३ बाद २४६ धावांपर्यंत पोहोचलेला विंडीजचा संघ दुसऱ्या दविसाच्या प्रारंभीच सात बाद २६९ वर पोहोचला. त्यानंतर पुन्हा टेलरने ४० धावांची दमदार खेळी करीत आणि चंदरपॉलला साथ देत विंडीजचा डाव तीनशेच्या पल्याड पोहोचवला.

केमारचा ‘पंच’
विंडीजच्या केमार राेचने पाच बळी घेऊन बांगलादेशवर पराभवाचे सावट निर्माण केले. त्याने तमीम इक्बालसह शमसूर रेहमान, नासीर हुसेन, ताज्जीमूल, अनाहुल हकला बाद केले.