आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेसी, नेमारच्या डबल धमाक्याने बार्सिलोनाची एलाचेवर ६-० ने मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - बार्सिलोनाने ला लीगा स्पॅनिश लीगमध्ये एलाचे संघाला ६-० ने हरवले. बार्सिलोनाकडून लियोनेल मेसी आणि नेमार यांनी प्रत्येकी २ गोल केले. बार्सिलोनाकडून पहिला गोल ३५ व्या मिनिटाला झाला. जावीच्या शानदार मुवला पीक्यूने गोलमध्ये बदलून संघाला १-० ने आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या हाफमध्ये ५५ व्या मिनिटाला बार्सिलोनाला पेनल्टी मिळाली. यावर मेसीने डाव्या पायने किक मारताना दुसरा गोल केला. ६९ व्या मिनिटाला नेमारने गोल करून ३ -० आघाडी केली. दोन मिनिटांनंतर नेमारने दुसरा गोल करून स्कोअर ४-० असा केला. ८८ व्या मिनिटात मेसीने तर ९३ व्या मिनिटाला पेड्रोने गोल करून सामन्याचे चित्र बदलले.