आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्सिलोना फुटबॉलपटू नेमार पडला सुपर मॉडेलच्‍या प्रेमात; इंस्‍टाग्रामवर पोस्‍ट केले फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राझील - बार्सिलोनाचा स्‍टार फुटबॉलपटू नेमार ब्राझीलमधील सुपर मॉडेल गिसेले बुंदचेनच्‍या प्रेमात पडला आहे. गिसेले सोबत वोब मॅग्‍झीनसाठी केलेल्‍या फोटोशुटची छायाचित्रे त्‍याने इंस्‍टाग्रामवर पोस्‍ट केले आहेत.

बार्सिलोनाने रियल माद्रिदला 4-3 अशा फरकाने पराभूत केल्‍यानंतर आनंदाच्‍या भरात नेमारने ही छायाचित्रे पोस्‍ट केली. याच सामन्‍यामध्‍ये लियोनल मेस्‍सीने हॅट्रिक साधली होती.

डेली मेलने दिलेल्‍या वृत्‍तानुसार, 'नेमार सध्‍या वोग मॅग्‍झीणच्‍या फोटोशूटसाठी व्‍यस्‍त आहे. त्‍याच्‍यसोबत 33 वर्षीय सुपर मॉडेल गिसेले बुंदचेन आहे. फोटोसोबत त्‍याने काही संदेशही इंस्‍टाग्रामवर पोस्‍ट केला आहे. या फोटोशुटदरम्‍यान नेमारने गिसेलेला फुटबॉल मधील काही टिप्‍स दिल्‍या असल्‍याचा व्हिडिओ प्रसिध्‍द झाला आहे.'

उल्‍लेखनिय बाब ही, की हे फॅशन मॅग्‍झीण विविध मॉडेल्‍स आणि खेळाडू यांना स्‍वत:ला जोडण्‍याचे काम करते. नेमार आणि गिसेलेला एकत्र आणण्‍यासाठी या मॅग्‍झीणने दोघांनाही मोठी रक्‍कम दिली आहे.

पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि पाहा, नेमार आणि सुपर मॉडेल गिसेलेची छायाचित्रे...