आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Barcelona Win In La Football, Messy, Nayamar, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ला लीग: मेसी @ ४००; नेमारची हॅट‌्ट्रिक, बार्सिलोना विजयासह अव्वलस्थानी विराजमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - स्टार खेळाडू लियोनेल मेसी (६२, ८२ मि.) आणि नेमार (२६,४५,६६ मि.) यांच्या शानदार खेळीच्या बळावर बार्सिलोनाने ला फुटबॉल लीगमध्ये रविवारी एकतर्फी विजयाची नोंद केली. जबरदस्त फॉर्मात असलेल्या बार्सिलोनाने लढतीत ग्रॅनडा सीएफला ६-० अशा फरकाने पराभूत केले. रॅकिटीकनेही (४३ मि.) संघाच्या विजयात एका गाेलचे योगदान दिले. याशिवाय बार्सिलोनाने गुणतालिकेत अव्वलस्थान गाठले.

नेमारने बार्सिलोनाला दमदार सुरुवात करून दिली. त्याने २६ व्या मिनिटाला गोलचे खाते उघडले. त्यानंतर रॅकिटीकने ४३ व्या मिनिटाला संघाच्या आघाडीला २-० ने मजबूत केले. त्यापाठोपाठ अवघ्या दोन मिनिटांत नेमारने गोल केला. त्यानंतर त्याने ६६ व्या मिनिटाला गोलची हॅटट्रिक आपल्या नावे केली.

रोनाल्डोचा गोल; माद्रिद विजयी
क्रिस्टियानो रोनाल्डो (४० मि.) आणि माद्रिद (३२ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून ला लीगमध्ये रिअल माद्रिदला विजय मिळवून दिला. या संघाने लढतीत व्हिल्लारेल सीएफचा २-० अशा फरकाने पराभव केला. या संघाने मध्यंतरापूर्वीच एकतर्फी विजय निश्चित केला हाेता. तसेच अ‍ॅथलेटिको माद्रिदने सेव्हिलाचा ४-० ने पराभव केला.

मेसीचे ४०० गोल पूर्ण
फिफाचा चार वेळचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार विजेता लियोनेल मेसीने करिअरमध्ये ४०० गोल पूर्ण केले. त्याने ५२५ सामन्यांतून या विक्रमी गोलच्या आकड्याला गवसणी घातली. त्याने ग्रॅनडाविरुद्ध लढतीत दोन गोल केले. मेसीने बार्सिलोनासाठी ३५९ गोल केले. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण ४२ गोलची नोंद केली आहे.

करिअरमध्ये हा यशाचा मोठा पल्ला गाठला जाईल, याची कल्पनासुद्धा मी केली नव्हती. शुभेच्छा देणा-या चाहत्यांची आभारी आहे. भविष्यात मी मेहनत करत राहणार आहे.’
लियोनेल मेसी, बार्सिलोना