आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बार्सिलोनाकडून लियोनेल मेसीचे 300 गोल..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रँडफा - स्टार खेळाडू लियोनेल मेसीने बार्सिलोना फुटबॉल क्लबकडून 300 गोल पूर्ण केले. ग्रँडफाविरुद्ध दोन गोल करून त्याने हा विक्रम आपल्या नावे केला. सामन्याच्या 50 व 73 व्या मिनिटाला गोल करून मेसीने बार्सिलोनाला स्पॅनिश लीगमध्ये विजय मिळवून दिला. बार्सिलोनाने लीगमध्ये ग्रॅँडफा सीएफवर 2-1 ने मात केली.

नुइवो लॉस कार्मेन्स मैदानावरील सामन्यात यजमान ग्रॅँडफाने 26 व्या मिनिटाला आघाडी घेतली. इघालोने यजमानांकडून गोलचे खाते उघडले. पिछाडीवर पडलेल्या पाहुण्या बार्सिलोनाने मध्यंतरापूर्वी लढतीत बरोबरी मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मेसीच्या संघाला यश मिळाले नाही. अखेर दुस-या हाफमध्ये मेसीने दमदार पुनरागमन करत बार्सिलोनाला बरोबरी मिळवून दिली. त्याने 50 व्या मिनिटाला पहिला गोल केला. या गोलच्या बळावर गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या बार्सिलोनाने लढतीत 1-1 ने बरोबरी मिळवली.

50 व्या मिनिटाला 300 वा गोल
मेसीने लढतीच्या 50 व्या मिनिटाला बार्सिलोनासाठी पहिला गोल करून 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. हाच त्याचा बार्सिलोनाकडून 300 वा गोल ठरला. यानंतर सामन्याच्या 73 व्या मिनिटाला त्याने दुसरा गोल करून संघाला 2-1 अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. बार्सिलोनाकडून आता त्याच्या नावे 301 गोल झाले आहेत.


गेटाफे सीएफ, मलगा संघांनीही मिळवला विजय
गेटाफे सीएफ व मलगा सीएफनेही लीगमध्ये विजय मिळवून आगेकूच केली. गेटाफेने सेल्टा डी विगोला 3-1 अशा फरकाने धूळ चारली. कोलुंगा (10 मि.), कास्ट्रो (34 मि.), फर्नांडिस (42 मि.) यांनी गेटाफेला विजय मिळवून दिला. दुसरीकडे मलगा सीएफने अ‍ॅथलेटिक बिल्बाओवर 1-0 ने मात केली. साविओलाने 18 व्या मिनिटाला गोल करून मलगाला 1-0 ने आघाडी मिळवून दिली होती. या आघाडीला कायम ठेवत मलगाने विजय मिळवला.