आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Baseball Player Stanton Signs 20 Billion Rs Deal With Miami Team

अबब, बेसबॉलपटू स्‍टान्‍टनसोबत 20 अब्‍जांचा करार, तासागणिक मिळणार 1.76 लाख रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - जियान कार्लो स्टेन्टन)
न्युयॉर्क- अमेरिकन बेसबॉलपटू जियान कार्लो स्टान्टनने मियामी मार्लिन्स संघासोबत तब्‍बल 325 मिलियन डॉलरचा (अंदाजे 20 अब्‍ज रुपये) करार केला, अशी माहिती मार्लिन्स संघाचे मालक जॅफरी लॉरिया यांनी MLB.com ला फोनद्वारे दिली. व्‍यावसायिक खेळातील सर्वांत महागडा करार म्‍हणून या कराराची क्रीडाजगतात चर्चा होत आहे.
स्टान्टनपूर्वी सर्वांत महागडा करार मेजर लीग बेसबॉलचा खेळाडू मिगुएल कॅब्रेराच्‍या नावे होता. त्‍याने डेट्रॉइट टाइगर्स टीमसोबत तब्बल 18 अब्‍ज रुपयांचा करार केला होता. केवळ 9 महिन्‍यात हा रेकार्ड स्‍टान्‍टनने तोडला आहे. या करारान्‍वये स्‍टान्‍टनला मियामी संघात बॅटिंग करण्‍यासाठी 50,000 डॉलर(31 अब्‍ज रुपये) मिळणार आहेत. म्‍हणजेच प्रत्येक तासाला 1.76 लाख रुपये मिळणार आहे.
काय आहे करार?
स्‍टान्‍टनच्‍या करारामध्‍ये खालील गोष्‍टी अंतर्भूत आहेत-
* नो ट्रेड क्लॉज – कराराच्‍या या कार्यकाळात स्‍टान्‍टन दुस-या संघासोबत करार करू शकत नाही.
* 25 सहा वर्षांपर्यंतचा हा करार आहे.
कोन आहे स्टेन्टन ?
जियान कार्लो स्टान्टन कॅलिफोर्नियाचा रहिवासी असून 2014 मध्‍ये त्‍याचे चांगले प्रदर्शन राहिले आहे. यावर्षी त्‍याने 'सिल्वर स्लगर अवार्ड' आणि 'एनएल हँक आरोन अवार्ड'सुध्‍दा मिळाला आहे. एवढेच नाही तर मेजर लीग बेसबॉलच्‍या ऑल-स्टार गेम टीमचा तो सदस्‍यही राहिला आहे.
भारतीय खेळाडू आहेत कोसो दूर
महागड्या कराराबाबत भारतीय खेळाडू कोसो दूर आहेत. दिल्ली डेयरडेविल्सचा दिनेश कार्तिकला 12.5 कोटी रुपयांमध्‍ये करारबध्‍द करण्‍यात आले होते. कोलकाता नाइटराइडर्सचा कर्णधार गौतम गंभीरला 2011 मध्‍ये केकेआरने 11.04 कोटी रुपयांत कराबध्‍द केले होते.
याच वर्षी 'इंडियन सुपर लीग' फुटबॉल टूर्नामेंटमध्‍ये एलेसँड्रो डेल पियेरोला 10.8 कोटी रुपयांत करारबध्‍द करण्‍यात आले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, टॉप-10 महागडे खेळाडू ...