आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंक्यपद बास्केटबाॅल स्पर्धा: गेम चेंजर बाॅइज, टेंडर केअर हाेमची अागेकूच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद- पाेदार स्कूल, गेम चेंजर बाॅइज अाणि टेंडर केअर हाेम संघाने साेमवारी यंगस्टर्स जिल्हा बास्केटबाॅल स्पर्धेत साखळी सामन्यातील विजयासह अागेकूच केली. एमएसएम बास्केटबाॅल असाेिसएशनच्या वतीने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर या स्पर्धेचे अायाेजन करण्यात अाले.

मुलांच्या गटात गेम चेंजर बाॅइजने शानदार विजयाची नाेंद केली. या संघाने साखळी सामन्यात पाेदार इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचा ४५-२८ अशा फरकाने पराभव केला. वेदांत जैस्वाल, विशाल वाकळे, वेदांत जामगावकरने केलेल्या शानदार बास्केटच्या बळावर गेम चेंजर बाॅइज ग्रुपने सामना जिंकला. पाेदार स्कूलच्या ऋग्वेद जाेशी, तुषार बलांडे व निश्चय साळवेची खेळी अपयशी ठरली.

दुसरीकडे टेंडर केअर हाेमने लढतीत पाेदार स्कूल ब संघावर १०-२ ने मात केली. या पराभवासह पाेदार संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

अाता स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत स्वाभिमान क्रीडा मंडळाचा सामना पाेदार स्कूलशी हाेईल. तसेच गेम चेंजर्ससमाेर एमएसएमचे तगडे अाव्हान असेल.

रचनाने साकारला पाेदारचा विजय
मुलींच्या गटात एमएसएम संघाविरुद्ध राेमहर्षक लढतीत रचना इंदुलेने पाेदार स्कूलचा विजय साकारला. ही रंगतदार लढत शेवटच्या सहा सेकंदांपर्यंत बराेबरीत रंगली हाेती. मात्र, रचनाने प्रतिस्पर्धी संघाच्या निकिता मालवेच्या हातून बाॅल हिसकावत बास्केटसह एका गुणंाची कमाई केली. यासह तिने सामन्याला कलाटणी दिली. या एका गुणांच्या अाघाडीने पाेदार स्कूलच्या संघाने ६-५ अशा फरकाने राेमहर्षक विजय संपादन केला. या संघाने साखळी सामन्यात अवघ्या एका बास्केटच्या फरकाने बाजी मारली.