आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा झेल घेऊन बटलर महान खेळाडूंच्या पंक्तीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - वनडे क्रिकेट सामन्यात सहा खेळाडूंना बाद करून भीम पराक्रम करणारा इंग्लंडचा यष्टिरक्षक जोस बटलर वनडे क्रिकेट जगातला सातवा आणि इंग्लंडचा तिसरा यष्टिरक्षक ठरला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 च्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने ही कामगिरी केली. हा उपांत्य सामना किंगस्टन ओव्हल येथे 19 जून 2013 रोजी पार पडला. या सामन्यात बटलरने सहा खेळाडूंचे झेल घेतले. जोस बटलरपूर्वी ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्ट, आफ्रिकेचा मार्क बाऊचर, भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, माजी यष्टिरक्षक रिडली जेकब्स आणि इंग्लंडकडून मॅट प्रायर व अ‍ॅलक स्टिवर्ट यांनी अशी कामगिरी केली.