आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Batsman Responsible For Defeat Says Stephen Fleming

पराभवास फलंदाज जबाबदार: स्‍टीफन फ्लेमिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या पराभवाचे खापर चेन्नई सुपरकिंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी फलंदाजांवर फोडले. आमचे फलंदाज ज्या पद्धतीने बाद झाले ते मान्यच होऊ शकत नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

‘खेळपट्टी चांगली होती. दुसर्‍या डावात धावांचा पाठलाग करताना स्कोअरसुद्धा कठीण नव्हता. आवाक्यात होता. एक वेळ आम्ही चांगल्या स्थितीत होतो. मात्र, आम्ही अत्यंत लाजिरवाणी फलंदाजी केली. चुकीच्या फटक्यांचे नुकसान भोगावे लागले. काही फलंदाज तर न समजण्यासारखे बाद झाले. असे बाद होणे मान्य करता येणारच नाही,’ असे फ्लेमिंग सामन्यानंतर सांगितले.