1 जानेवारी, 2014 रोजी जेव्हा कोरी अँडरसनने शाहीद आफ्रिदीचा 37 चेंडूतील शतकाचा विक्रम मोडला होता. त्यानंतर हा विक्रम सहजासहजी कोणी मोडू शकणार नाही, असे तज्ज्ञांचे मत होते. रविवारी वेस्ट इंडिजच्या विरोधात साऊथ आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स ने तुफानी खेळी करत केवळ 31 चेंडूत 100 धावांचा नवा विक्रम केला. त्यामुळे कोरी अँडरसनचा विक्रम केवळ 1 वर्ष आणि 17 दिवसांत मोडीत निघाला.
विक्रमी 16 षटकार
डिव्हिलियर्सने प्रत्येक गोलंदाजाच्या गोलंदाजीवर षटकारांची बरसात केली. तो जेव्हा बाद झाला त्यावेळी त्याच्या 44 चेंडूंमध्ये 149 धावा झाल्या होत्या. या दरम्यान त्याने 9 चौकार आणि 16 षटकार लगावले होते. एका डावात सर्वाधिक षटकारांचा हा विक्रम आहे. या विक्रमाने त्याने भारताच्या रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
या नव्या विश्वविक्रमानंतर आता हा विक्रम कोण मोडू शकतो, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. सर्वात आधी या यादीत नाव येते ते स्वतः डिव्हलियर्सचे. वन डेमध्ये सर्वात स्फोटक फलंदाज म्हणून त्याला ओळखले जाते. इतरही काही फलंदाज आहेत, ज्यांच्यामध्ये हा विक्रम मोडण्याची क्षमता आहे.
पुढील स्लाइड्वर जाणून घ्या, कोणते फलंदाज मोडू शकतात हा विक्रम...