आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍पॉट फिक्सिंग: बांगलादेशचा माजी कर्णधार मोहम्‍मद अश्रफुल निलंबित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका- स्‍पॉट फिक्सिंग आणि मॅच फिक्सिंग प्रकरणाचे लोण आता बांगलादेशातही पोहोचले आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्‍मद अश्रफुल याला बांगलादेश क्रिकेट मंडळाने स्‍पॉट फिक्सिंग आणि मॅच फिक्सिंगमधील सहभागावरून निलंबित केले आहे. आयसीसीच्‍या भ्रष्‍टाचार प्रतिबंधक विभागाने अश्रफुलचा बांगलादेश प्रीमियर लीगमध्‍ये स्‍पॉट आणि मॅच फिक्सिंगमध्‍ये सहभाग असल्‍याचा पुरावा क्रिकेट मंडळाला दिला होता.

अश्रफुलने फिक्सिंगमध्‍ये आपला सहभाग असल्‍याची कबुली दिल्‍याचे बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्‍यक्ष नजमुल हसन यांनी सांगितले. अश्रफुलला आता क्रिकेटच्‍या कोणत्‍याही प्रकारात भाग घेता येणार नसल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले. अश्रफुलवर बांगलादेश प्रीमिअर लीग टी-20 स्‍पर्धेत स्‍पॉट फिक्सिंगप्रकरणी पैसे खाल्‍याचा आरोप आहे.