आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूडीआरएसबाबत बीसीसीआयची ‘अढी’ कायम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रणजी क्रिकेट स्पर्धेच्या नव्या स्वरूपातील, यंदाच्या हंगामातील बदलाची सर्व राज्यांच्या रणजी कप्तान व प्रशिक्षकांनी एकमुखाने स्तुती केली. मात्र, या स्वरूपातील काही त्रुटी दूर करण्याचे आवाहनही बीसीसीआयला केले आहे. मुंबईत मंगळवारी दिवसभर झालेल्या या चर्चासत्रात बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष एन. श्रीनिवासन, माजी अध्यक्ष शशांक मनोहर, तांत्रिक समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळे यांनीही आपापली मते मांडली.
मुंबई रणजी संघाचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये ‘यूडीआरएस सिस्टिम’ वापरात आणता येईल का, अशी विचारणा केली होती. बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनीच त्यावर भाष्य करताना सांगितले, ‘यूडीआरएस सिस्टिम’ जोपर्यंत ‘फुलप्रूफ’ होत नाही तोपर्यंत वापरात आणणे कठीण आहे.

प्रत्येक रणजी सामन्यासाठी सध्याची ‘डीआरएस’ यंत्रणा उभारणे शक्य नाही. बॉल ट्रॅकिंग करणारा तंत्रज्ञ प्रत्यक्षात सामना न पाहता केवळ चित्रफितीच्या आधारे तो चेंडू स्टम्पवर आदळणार किंवा नाही हे निश्चित करतो. प्रत्यक्ष त्यापेक्षाही जवळ असणा-या पंचावरही अविश्वास व्यक्त करण्यासारखे आहे. बॉल ट्रॅकिंग दाखवणा-या चेंडूची उसळीदेखील दाखवतो. प्रत्यक्षात तेथे स्पॉट आहे किंवा नाही हे ज्ञात नसतानाही ते कसे शक्य होते? काही गोष्टी समजण्यापलीकडे आहेत. त्यामुळे ‘डीआरएस’वर अद्यापि पूर्ण विश्वास नाही. मात्र, झेल टिपण्यासाठी या यंत्रणेचा वापर होऊ शकतो.

या चर्चासत्रातील काही सूचना अशा होत्या
*रणजी सामन्यांदरम्यानचा अवधी 3 ऐवजी 4 दिवसांचा तरी असावा.
*नव्या गुणांकन पद्धतीत बोनस गुण घेणा-या संघाला जादा गुण मिळतो तसा त्याविरुद्ध खेळणा-या संघाचा एक गुण कमी करावा.
*एकदिवसीय रणजी सामने त्या त्या विभागातील संघात खेळवण्याऐवजी अखिल भारतीय पातळीवरील व्हावेत.
*प्रत्येक संघ स्वत:ला खेळपट्टी अनुकूल करून घेत असतो. त्यामुळे सामने त्रयस्थ केंद्रावर व्हावेत.
*पहिल्या डावातील आघाडीवर सामना निकाली होणार असेल तर नंतर सामना निरस होतो. त्यासाठी पूर्वीप्रमाणे फलंदाजी व गोलंदाजीसाठी गुण देण्यात
यावेत.हैदराबाद कसोटीत पंचांनी स्वत:हून दोन वेळा तिस-या पंचांशी चर्चा करून निर्णय दिले होते याची श्रीनिवासन यांनी आठवण करून दिली.